कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनाही सोमवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.विधि व न्याय विभागामार्फत सोमवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जाधव यांना हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यमंत्रीपदाला मिळणाऱ्या सर्व सोयी आणि सुविधा जाधव यांनाही मिळणार आहेत.महेश जाधव यांच्याआधी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.
पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.