शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Kolhapur: ए. एस. ट्रेडर्स प्रकरणातील मुख्य संशयित अटकेत, सापळा रचून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:51 PM

कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे इथल्या हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

कोल्हापूर : बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स प्रकरणातील मुख्य फरार संशयित आरोपी दीपक बाबूराव मोहिते याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी आरे (ता. करवीर) येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.ए. एस. ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे इथल्या हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. अनेकदा त्याने पोलिसांनी गुंगारा दिला होता. तो रविवारी आरे येथील घरी आल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.संशयित मोहिते याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम या कंपनीत गुंतवली होती. या प्रकरणात कंपनीच्या २८ संचालकांविरोधात २५ नोव्हेंबर २०२२ रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार, बाबूराव हजारे, विक्रम नाळे, नामदेव पाटील, अमर चौगले, सुवर्ण सरनाईक, बाळासो धनगर, बाबूराव धनगर, साहेबराव शेळके, श्रुती सावेकर, राजेश पाडळकर, रोहित रोकडे, अमित शिंदे अशा १६ जणांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस