कोल्हापूर : जिल्ह्यातील आरोग्य विभागात सर्व कंत्राटी कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर व करार तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांना शुक्रवारी देण्यात आले.
कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसताना कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने जिवाची पर्वा न करता काम केले आहे आणि करीत आहेत. पण त्यांचा काहीही विचार न करता शासन नवीन भरती करणार आहे, असे न करता आधी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करून नवीन भरती करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष धनंजय परीट, सचिव विशाल मिरजकर, एकनाथ पाटील, दिगंबर कुंभार उपस्थित होते.
--