शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लघुपाटबंधाऱ्याची कामे रखडणार

By admin | Published: April 17, 2016 11:48 PM

वरिष्ठांचा नाकर्तेपणा : वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने नामुष्की

महेश आठल्ये- म्हासुर्ली --वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बी.डी.एस. प्रणालीद्वारे वेळेत निधी उपलब्ध न झाल्याने जलसंधारण विभागास मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी रद्द होण्याची नामुष्की ओढवली असून संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लघुपाटबंधाऱ्यांची कामे निधीअभावी रखडणार आहेत. परिणामी पुढील काही वर्षे जिल्हा ‘कोरडा’ राहण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद या नावाने कार्यरत असणाऱ्या या महामंडळामार्फत छोटे-मोठे लघुपाटबंधारे तलाव बांधून पाणी साठवण करणे, तसेच क्षारपड जमीन विकास कार्यक्रम राबविणे व राजीव गांधी योजना राबविली जाते. मात्र, या महामंडळाची मुदत संपल्याने या महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळास मुदतवाढ देऊन दहा हजार कोटी रुपयांचा निधीही देण्याची घोषणा केली. यावर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मंजूर झालेला २५० कोटींचा निधी बुडीत होण्याची वेळ आली.वरिष्ठ पातळीवर बी. डी. एस. प्रणालीद्वारे निधी उपलब्ध केला जातो. या प्रणालीत प्रत्येक जिल्हा आपापल्या जिल्ह्यातील कामांची नोंदणी करून निधी वळवून घेतला जातो. ३१ मार्च हा निधी खर्च करण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी रात्री उशिरापर्यंत निधी वळविण्यात येईल या अपेक्षेने अधिकारी वाट पहात बसले. मात्र, शेवटपर्यंत निधी जमा झाला नाही. या महामंडळास मुदतवाढीचे कारण पुढे करून निधी देण्यास टाळाटाळ केली. परिणामी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही खर्च करण्याची संधी मिळाली नाही. जिल्ह्यातील २० कोटींच्या निधीवरही पाणी सोडण्याची वेळ आली असून अर्धवट अवस्थेत रखडलेल्या जिल्ह्यातील पणोरे, (ता. पन्हाळा), वासनोली (भुदरगड), झापाचीवाडी (राधानगरी), आयरेवाडी, शेंबवणे, रनवरेवाडी (शाहूवाडी) आदी प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. बी. डी. एस. यंत्रणेतील घोळ : दरवर्षी बी. डी. एस. यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, यावर्षी १० वाजताच बंद केल्याने केवळ दोन तासात निधी वळवणे अडचणीचे ठरले. महामंडळाच्या निधीबरोबरच राज्यस्तरीय योजनांचा निधीही केवळ दोनच तासात उपलब्ध केल्याने तो खर्च टाकताना कसरत करावी लागली. तोही निधी बुडीत झाला. राज्यात १८९ कोटी रुपये मंजूर होते. मात्र, दोन तासांच्या खेळात कसाबसा २ कोटी ७८ लाख निधी उपलब्ध झाला. यामुळे राजीव गांधी सिंचन व कृषी विकास कार्यक्रमाची ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरूनही त्यांना लाभ मिळणार नाही, तर क्षारपड जमीन सुधारण कार्यक्रमांतर्गत उदगाव, कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील कामे ठप्प झाली आहेत. निधी बुडीत झाल्याने जलसंधारणाची कामेही ठप्प झाली आहेत. बी.डी.एस. : अंतिम दिवशी होते कार्यवाही...बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही आॅनलाईन प्रक्रिया असून राज्यशासनामार्फत या प्रणालीद्वारे प्रत्येक विभागवार पैसे ट्रेझरीत पाठविले जातात. तिथे प्रत्येक विभागाच्या कोडनंबरसह कामाप्रमाणे-मंजुरीप्रमाणे रक्कम त्या-त्या खातेप्रमुखांकडे वर्ग केली जाते व गरजेप्रमाणे ती खर्च केली जाते. यावर्षी ३१ मार्च रोजी आठ वाजता ही प्रणाली सुरू करून पैसे राज्यशासना- मार्फत वर्ग केले गेले व तसे कळविले. मात्र, बी. डी. एस. प्रणाली ८वा. सुरू होऊन १२ ऐवजी १०लाच बंद केली गेली. त्यामुळे पैसे जमा होणे व खर्च करणे अडचणीचे झाले. एकीकडे पैसे अंतिम क्षणी द्यायचे आणि घेताना अडचणी आणायच्या, असाच प्रकार घडला आहे. पैसे द्यायचेच होते तर ३६५ दिवसांत केव्हाही देता आले असते. मात्र, अंतिम दिवशी पैसे देऊन व ते काढून घेऊन सरकारने नेमके काय साधले? जेवायला बोलावून पाट द्यायचा, पण ताट द्यायचे नाही, असा हा प्रकार आहे.