जयसिंगपूर : २१ व्या शतकात चांगल्या विचारांची गरज असून, हे विचार पोहोचविण्याचे काम धार्मिक कार्यक्रमांतून होत आहे. माणसाने जीवनात मिळवायचे आहे ते फक्त नाव, आनंद व चांगल्या विचारांची देवाण-घेवाण. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सन्मान ठेवावा. विधानाच्या माध्यमातून धर्मगुरूंच्या वाणीतून चांगल्या विचारांची जोपासना होत आहे, असे प्रतिपादन नूतन आमदार सतेज पाटील यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मानस्तंभ द्वादश निमित्त भव्य कल्पद्रुम महामंडल विधान महामहोत्सवाच्या सहाव्या दिवशीच्या कार्यक्रमावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी मुनिश्री १०८ धर्मसागरजी महाराज, मुनिश्री १०८ समतासागरजी महाराज, ऐलक पार्श्वसागरजी महाराज व आर्यिका १०५ माताजी यांचे सान्निध्य लाभले.आ. पाटील पुढे म्हणाले, उदगाव येथील कुंजवन अतिशय क्षेत्राला १५ दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला आलो होतो. यावेळी आपण विजयी झाल्यावर पुन्हा एकदा या क्षेत्राला भेट देण्याचे ठरविले होते, ते आज पूर्ण झाले आहे. महोत्सवाला २५ हजार रुपये देणगी स्वरूपात देत असल्याचे त्यांनी सांगितले.गावातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी पंचामृत अभिषेक व महामंत्राचे जाप्य झाले. पार्श्वनाथ मंदिरातून कुंजवन येथील विधानस्थळी हस्तीवरून सवाद्य मंगलकलश आणण्यात आले. समवशरणावरती आप्पासो मादनाईक यांनी हत्तीवरून पृष्पवृष्टी केली.महोत्सवास आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे, डॉ. श्रीवर्धन पाटील, यशोदा कोळी, शोभा कोळी, संजय पाटील, संजय पाटील-कोथळीकर, नितीन बागे, प्रकाश लठ्ठे, अभिजित मगदूम, संजय चौगुले यांच्यासह श्रावक-श्राविका उपस्थित होते. दरम्यान, आज, शनिवारी भव्य रथोत्सव मिरवणूक निघणार आहे.
विधानाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची जोपासना
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM