कोल्हापूर : आईला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असताना मालवाहू आयशर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने मायलेक जागीच ठार झाले. सरिता संजय कोळी (वय ४०, रा. यशोदानगर, कणेरीवाडी, मूळ यड्राव, ता. शिरोळ ) व त्यांचा मुलगा निखिल (१८) अशी ठार झालेल्याची नावे आहेत. हा अपघात रविवारी पुणे-बंगलोर महामार्गावरील कणेरीवाडीजवळ झाला.अपघातप्रकरणी पोलिसांनी मालट्रक चालक उमेश विद्याराम श्रीवास (३१, रा. किरतपुरा - मध्य प्रदेश) याला ट्रकसह ताब्यात घेतले.
कोल्हापूरजवळ अपघातात मायलेक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:56 PM