यड्राव : शासनाने येथील ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी निवड केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने अभियानाअंतर्गत असलेल्या उपाययोजनांची कार्यवाही पहिल्यापासूनच सुरू असल्याने ‘माझी वसुंधरा’ अभियानाची वाटचाल गतिमान बनली आहे. यामध्ये ग्रामस्थांचा असलेला सक्रिय सहभाग हे अभियान यशस्वी होण्यासाठी पूरक ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे ‘माझी वसुंधरा’ अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ अखेर राबविण्यात येणार आहे.
अभियानाअंतर्गत १०० टक्के प्लास्टिक बंदी, अभियान जनजागृतीसाठी ठिकाणी भित्तिपत्रके लावली आहेत. चार ठिकाणी रेन हार्वेस्टिंग योजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थी व ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छतेची शपथ घेऊन बांधीलकी राखण्याची ग्वाही दिली आहे. या सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानाची वाटचाल गतिमान बनली आहे. ग्रामस्थांचा उत्साही सहभाग अभियान यशस्वितेसाठी पूरक ठरणार आहे.
चौकट - ग्रामपंचायतीकडून उपक्रम
बांबू लागवड, ३०० देशी झाडांची लागवड, वनौषधी झाडांची लागवड, एलईडी दिव्यांचा वापर व प्लास्टिक बंदी यांसह परिसराच्या स्वच्छतेसाठी कचरा संकलनाकरिता ग्रामपंचायतीकडून गाडीचा वापर सुरू केला आहे. नव्या दोन घंटागाड्या लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
फोटो - १११२२०२०-जेएवाय-०७
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेताना विद्यार्थी.