लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: मलकापुरात सुरू असलेल्या युनिक उड्डाणपुलाच्या कामात मोठी दुर्घटना घडली. ३२ टन वजनाचा सिग्मेंट बसवताना तांत्रिक बिघाडामुळे खाली कोसळला. यावेळी आसपास असलेले दोन कर्मचारी स्वतःला बचावण्याच्या प्रयत्नात जखमी झाले. शनिवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिगमेंट उचलताना रस्त्यावर आडवा नसल्यामुळे मोठी हानी टळली.
हरेंदर सिंग (वय २८) दिनेश सिंग (वय २९) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मलकापूरात सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मलकापुरात तीन किलोमीटर पट्ट्यात युनिक उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे. युनिक उड्डाणपुलाच्या सुमारे ८० पिलर वर सिग्मेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर नाका येथील क्रमांक ८५ व पिलर क्रमांक ८६ या रखाण्यात सिमेंट बसवण्याचे काम शनिवारी हाती घेतले होते. त्यापैकी पहिलाच सिग्मेंट सायंकाळी सात वाजल्यापासून बसवण्याचे काम कर्मचारी करत होते. या ठिकाणी पुलाला वळण असल्यामुळे सिगनेंट बसवायचे काम किचकट आहे. सिग्मेंट वर उचलण्यासाठी लावलेला क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सिगमेंट पाच ते सहा फूट उचलून परत खाली कोसळला. यावेळी सिगमेंटच्या आसपास काम करणारे कर्मचारी बाजूला पळाले व त्यापैकी दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
सिमेंट बसवताना जी काळजी घ्यावी लागते ती घेतली जात नाही याशिवाय पगार वेळेत न मिळाल्यामुळे टेक्निकली कर्मचारी काम सोडून गेले आहेत. सध्या काम सुरू आहे ते उर्वरित कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम सुरू आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत ही शंभर फुट रुंदीचा सिग्मेंट बसवताना आडवा केल्यानंतर तो दोन्ही सर्विस रोड वर सुद्धा जातो तो वर गेल्यानंतर जर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती दैव बलवत्तर म्हणून मोठी जिवीत हाणी टळली.