गेले दोन दिवस चक्रीवादळाच्या वाऱ्याने पन्हाळा शहर आणी परिसरात हाहाकार उडाला यातच पन्हाळा शहरात सुमारे ७४ मि.मी.पाऊस झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
पन्हाळा शहरात लहान मोठे सुमारे १२ वृक्ष उन्मळून पडलेने शहरातील वीज प्रवाह खंडित झाला होता. तो सुरळीत करण्यास पावसाने विलंब होत होता विद्युत कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुमारे ३६ तासानंतर वीज प्रवाह सुरळीत केला तर बहुतांशी घरावरील कौले,पत्रे उडून गेल्याचे वृत्त असून लॉकडाऊनमुळे तहसील कार्यालयाकडे दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात पडळ येथील जालिंदर मोहिते यांचे घरावरील संपूर्ण छत उडून गेल्याने सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.