कोल्हापूर : येथील निवृत्त मेजर राजेंद्र गजाननराव आडिसरे (वय ६३) यांचे नवी दिल्ली येथे शनिवारी निधन झाले. त्यांनी भारतीय लष्करात मराठा रेजिमेंटच्या माध्यमातून विविध आघाड्यांवर सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थामुळे मेजर आडिसरे यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्राणज्योत शनिवारी मालवली. लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते महू (मध्यप्रदेश) येथे स्थायिक झाले. कोल्हापुरातील एकमेव वीरचक्र विजेते मेजर जी. एन. तथा गजाननराव आडिसरे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव आणि कॅप्टन हिम्मत आडिसरे यांचे बंधू, तर लेफ्टनंट कर्नल वसंतराव मंडलिक यांचे भाचे होत. निवृत्त मेजर यांना आई आणि वडिलांच्या घराण्याकडून लष्करी सेवेचा वारसा लाभला होता.
फोटो (१४०४२०२१-कोल-मेजर राजेंद्र आडिसरे (निधन)
===Photopath===
140421\14kol_3_14042021_5.jpg
===Caption===
फोटो (१४०४२०२१-कोल-मेजर राजेंद्र आडिसरे (निधन)