शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भारत राखीव बटालियनसाठी जागा उपलब्ध करु

By admin | Published: February 08, 2016 1:04 AM

चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर

कोल्हापूर : भारत राखीव बटालियन-३ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्णांत १०० एकर भूखंड उपलब्ध न झाल्याने हा बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी शासनाला पाठविला आहे. त्यावर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बटालियन कोल्हापूरातचं स्थापन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी प्रस्ताव सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जागेअभावी बटालियन अहमदनगरकडे हलवू नये, आम्ही कोल्हापूर जिल्ह्णांत जागा उपलब्ध करुन घेवू अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन ३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या जागेवरील ‘वनसंज्ञा’ रद्द करण्याची प्रक्रिया खूप किचकट व वेळखाऊ असल्याने तेथील प्रस्ताव रद्द करून ‘वनसंज्ञा’ लागू नसलेल्या आणि गटनिर्मितीस योग्य जागेचा शोध जिल्ह्यात घेतला असता रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित केली होती. या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई २९ डिसेंबर २०१५ रोजी कोल्हापुरात आले होते. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. परंतु ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध केला. या बैठकीचा निर्णय बिष्णोई यांनी पोलीस महासंचालक दिक्षीत यांना पत्राद्वारे कळविला. त्यावर दिक्षीत यांनी जागे अभावी बटालियनचा तळ कोल्हापूरऐवजी अहमदनगर जिल्ह्णांतील मिरजगाव येथे स्थलांतराचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. मुखमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आल्यामुळे पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना प्रस्ताव घेवून तात्काळ बोलवून घेतले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव मुखमंत्र्यांना दिला. यावेळी मंत्री पाटील यांनी अहमदनगरला हे बटालियन हलवू नये, आम्ही लवकरचं बटालियनसाठी कोल्हापूरात जागा उपलब्ध करुन घेतो, अशी विनंती मुखमंत्र्यांना केली. बटालियनचे कर्मचारी दौंडला रवानाबटालियनचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेशकुमार हे ६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे यांना आज, सोमवारपासून बटालियनचा मुक्काम दौंडला हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बटालियनचे सर्व अधिकारी व कर्मचारी रविवारी सकाळीच दौंडला रवाना झाले. राधानगरी-अकिवाट येथील जागा अपुरी बटालियनसाठी १०० एकर जागेची आवश्यक्ता आहे. राधानगरी व अकिवाट (शिरोळ) येथील ग्रामस्थांनीही ग्रामसभेत हा तळ उभारणीसाठी ६० एकर जागा देण्याचा ठराव केला आहे. ही जागा बटालियनसाठी अपुरी आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढाकार घेणार आहेत.