नेसरी : शेतकºयांच्या प्रत्येक जमिनीची पोत तपासणी, चांगले बी-बियाणे, खते द्यायचे नियोजन असून पशुधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत शेतकºयांचे उत्पादन वाढणार नाही. शेतकºयांचे टाकाऊ पिंजार, पालापाचोळा, उसाचा पाला असे काहीही वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये ६ ठिकाणी मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पैकी १ प्रकल्प कोल्हापुरात आणणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रमेशराव रेडेकर फौंडेशन अंतर्गत समृद्ध शेतकरी अभियानच्या ई-मोबाईल पशुचिकित्सालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष शेतकरी नेते पाशा पटेल, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतीपासून महानगरपालिका जिंकण्याचा सपाटा लावला आहे. लोक काँगे्रसला कंटाळलेले असून कर्नाटक भाजपने जिंकल्यात जमा आहे, असेही ते म्हणाले.पाटील म्हणाले, रेडेकर यांनी सुचविलेल्या ५० खाटांचा दवाखाना, हिरण्यकेशीतील पाणी नरेवाडी बंधाºयात व चंदगड पूर्व भागातील जनतेच्या पाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.आमदार हाळवणकर म्हणाले, चंदगड मतदारसंघातील सगळे प्रकल्प मार्गी लावू. दौलत कारखान्यात मुश्रीफ यांनी राजकारण केले व कारखाना बंद पाडला. तेव्हा आता डिजीटल नेतृत्व नको आहे, असा टोला डॉ. नंदाताई बाभूळकर यांना मारून चंदगडचा आमदार भाजपचाच असेल, अशी ग्वाही दिली. यावेळी अमल महाडिक यांचेही भाषण झाले.रमेश रेडेकर म्हणाले, गरीब व गरजूंसाठी ५० खाटांचे रुग्णालय उभारावे आणि ३५८ गावांतील रस्ते, वीज व पाण्यासाठी ३०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. ई-मोबाईल व्हॅन प्रत्येक जि. प. मतदारसंघात देणार असल्याचेही रेडेकर यांनी सांगितले.प्रारंभी पालकमंत्र्याच्याहस्ते गाडी चालवून ई-मोबाईल पशुचिकित्सालय व्हॅनचा प्रारभ झाला. यावेळी अशोक चराटी, गोपाळराव पाटील, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, आजरा अर्बन अध्यक्ष विलास नाईक, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. अनिल देशपांडे, अॅड. हेमंत कोलेकर, सभापती जयश्री तेली, बाबा देसाई, लक्ष्मणराव शिंगटे, प्रा. सुधीर मुंज, मलिक बुरूड, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील आदी उपस्थित होते.त्यांना आठ हत्ती आणावे लागतीलकोल्हापूरला ४०० कोटी आणा, हत्तीवरून मिरवणूक काढतो म्हणणाºयांनी मी ४००० कोटींची विकासकामे केली आहेत. तेव्हा आता त्यांना ८ हत्ती आणावे लागतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी हाणला.
शेतकऱ्यांसाठी मोठा प्रकल्प कोल्हापुरात आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:03 AM