शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

विम्याच्या ३५ कोटींसाठी मृत्यूचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 1:17 AM

मृत गडहिंग्लजचा : जळीत कारप्रकरणी बिल्डर अमोल पवार, भाऊ विनायकसह दोघांना अटक

कोल्हापूर : विम्याचा ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक संशयित अमोल जयवंत पवार (वय ३१, रा. अपराध कॉलनी, साने गुरुजी वसाहत) व त्याचा भाऊ विनायक (३५) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आजरा-आंबोली मार्गावर झालेल्या चारचाकी गाडीच्या अपघाताचा छडा अवघ्या १२ दिवसांत पोलिसांनी लावला.या गाडीमध्ये मृत झालेला गडहिंग्लज येथील रमेश कृष्णाप्पा नाईक (१९) या तरुणाचा संशयितांनी गळा आवळून खून केला व डिझेलने गाडी पेटवून दिली होती. बांधकाम व्यवसायामधून कर्ज झाल्याने संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ या दोघांनी हे कृत्य केले, अशी माहिती गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील पाचगाव-गिरगाव माळावर उचगावमधील एकाचा पुण्यातील गुंड लहू ढेकणे यानेसुद्धा स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला होता. ढेकणे याचाही पर्दाफाश करून त्यालाही कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. याबाबत प्रदीप देशपांडे म्हणाले, २९ फेबु्रवारी २०१६ रोजी आजरा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मी पुलाखालील ओढ्यामध्ये कारचा अपघात झाला होता. त्यामध्ये कार पूर्णपणे जळालेल्या स्थितीत तसेच चालकाची कवटी व हाडे शिल्लक राहिली होती. हा प्रकार समजताच गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील व आजरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मिरधे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मृताची ओळख पटत नव्हती. सागर पाटील यांनी घटनेची पोलिस दप्तरी प्रथम अपघात म्हणून नोंद केली. तपासामध्ये जळालेल्या गाडीचा क्रमांक एमएच ०९ बीएक्स ७७१० असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) मदत घेऊन या गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता त्यामध्ये ही गाडी अमोल पवार याची निष्पन्न झाली.दरम्यान, गडहिंग्लज पोलिस ठाण्यात रमेश कृष्णाप्पा नाईक हा बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी नाईकच्या घरातील व्यक्तींनी एक बांधकाम व्यावसायिक रमेशकडे आला होता, असे सांगितले. त्याप्रमाणे प्राथमिक तपास केला असता अमोल पवार हा मृत नसून जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक हे दोघे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी या व्यवसायाकरिता वेगवेगळ्या बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकार यांच्याकडून मोठ्या रकमेची उचल केली होती. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ३५ कोटी रुपयांची अशी मोठी विमा पॉलिसी काढली होती.हा गुन्हा उलगडण्यासाठी साहाय्यक निरीक्षक विकास जाधव, रमेश खुणे, रवींद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित, सुशील वंजारी, मिरधे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल यशवंत उपराटे, शिवाजी खोराटे, प्रशांत माने, संजय हुंबे, संजय कुंभार, जितेंद्र भोसले, प्रकाश संकपाळ, संजय काशीद, राजेंद्र निगडे यांनी मदत केली.यावेळी पत्रकार परिषदेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी,उपअधीक्षक डॉ. सागर पाटील उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा घातपात असल्याचा संशय सर्वप्रथम बळावला. त्यानुसार आम्ही हाडे व कवटी तपासासाठी मिरज येथे पाठविली. त्यामध्ये सुमारे १९ ते २० वर्षांच्या तरुणाची ही हाडे व कवटी असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल दिला. त्यानुसार पुणे येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे डीएनए तपासण्यासाठी ही हाडे व कवटी पाठविण्यात आली. त्याचा अहवाल तत्काळ या प्रयोगशाळेकडून प्राप्त केला.-डॉ. सागर पाटील, उपअधीक्षक, गडहिंग्लज विभाग.अमोल व विनायक पवार या दोघांना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यासाठी घटनास्थळाचा पंचनामा, मृताचा डीएनए चाचणी अहवाल असे विविध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.- दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर. अमोलची गडहिंग्लज, आजरा परिसरात टेहळणीआजरा, गडहिंग्लज या परिसरात अमोल पवार हा २० ते २५ फेबु्रवारी या काळात सावज शोधण्यासाठी फिरत होता. त्याने खुदाईकाम करण्यासाठी तीन ते चारजणांना विचारले; पण त्यांना संशय आल्याने ते आले नाहीत. त्यानंतर अमोल पवार याला गडहिंग्लजमधील रमेश नाईक भेटला. त्याने एक दिवसासाठी १७०० रुपये देतो असे सांगून त्याला तेथून घेऊन गेला. असा केला घात... रमेश नाईक याला अमोल याने कारमधून उत्तूर (ता. आजरा) येथे घेऊन आला. तेथे असलेल्या विनायकला घेऊन हे तिघेजण आजरा-आंबोली मार्गावर गेले. त्या ठिकाणी रमेश नाईक याचा प्रथम दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांनी नाईक याची कपडे बदलून त्याला अमोल पवारची कपडे, त्याचे घड्याळ घातले. त्यानंतर ते लक्ष्मी पुलाखालील ओढ्यामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी गाडीसह मृत रमेश नाईकला ओढ्यात ढकलून दिले. त्यानंतर खाली जाऊन दोघांनी गाडीचे बॉनेट उघडून इंजिनवर, रमेश नाईकवर व गाडीतील सीटवर डिझेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर दोघे तेथून पसार झाले व पुढे अमोल पवार हा बेळगाव, बंगलोर, चेन्नई, पुडुचेरी, कोची या भागांत राहिला.चार लाख ९६ हजारांचा पहिला हप्तासंशयित अमोल पवार याने २६ फेबु्रवारी २०१६ रोजी ३५ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली. त्यानुसार पवारने वैद्यकीय तपासण्या करून त्याचे प्रमाणपत्र विमा पॉलिसीला जोडले. त्यासाठी पहिला हप्ता म्हणून अमोलने चार लाख ९६ हजार रुपये भरले आहेत.