शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडे करा

By admin | Published: May 25, 2016 1:01 AM

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : पाऊस नसला तरी यंत्रणा सज्ज; १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात गावपातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबरोबरच सर्व विभागांनी १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी येथे दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चालू वर्र्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सक्षम ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, ‘सर्व यंत्रणांनी आपापल्या विभागांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म आराखडे तत्काळ तयार करावेत. १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत मुख्यालय सोडू नये. जिल्ह्णात सर्वसाधारणपणे १२९ गावे पूरबाधित होतात. या गावांत सर्व विभागांनी नोडल आॅफिसर यांची नेमणूक करावी. शोध व बचाव पथके आणि आवश्यक साहित्य अद्ययावत ठेवण्यात यावे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणारपाटबंधारे विभागाने धरणनिहाय स्वतंत्र नोडल आॅफिसर नेमावा. दैनंदिन पाणीसाठे, विसर्ग, पर्जन्यमान यांचे नियोजन करावे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देणेही इतकेच महत्त्वाचे आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव या जिल्ह्णांमध्ये पूरपरिस्थितीत पाणी सोडण्याचे नियोजन समन्वयाने व्हावे, या दृष्टीने या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली. कोल्हापूर पद्धतीच्याबंधाऱ्यांची दुरुस्तीजिल्ह्णात २८२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून त्यांची दुरुस्ती होणे महत्त्वाचे असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ आराखडा तयार करून त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी सूचना सैनी यांनी केली. विविध शासकीय योजनांतून बांधलेल्या बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.पर्यायी मार्ग तयार ठेवाआपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध झालेल्या सर्व साहित्याची तपासणी करून मॉकड्रिल घेण्याची सूचना करून जिल्हाधिकारी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. तेथील रस्ते पाण्याखाली गेल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांच्या सुटकेसाठी यंत्रणा सज्ज असली पाहिजे.भूस्खलन गावांचा सर्व्हेभूस्खलनाबाबत नियोजन करा. भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या गावांचा सर्व्हे करा. डोंगराळ भागात याबाबतची विशेष खबरदारी घ्या. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवा. यामध्ये गॅसकटर, जेसीबी, पोहणारे यांच्या संपर्कयाद्या तयार कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांकनियंत्रण कक्षाचा १०७७ हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक असे : ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६२२९५३ असे आहेत. पोलिस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी १०० तसेच ०२३१-२६६२३३३ हा क्रमांक उपलब्ध आहे.अशी आहेत तालुकानिहाय १२९ पूरबाधित गावे : शिरोळ : ३८, करवीर : २३, हातकणंगले : २०, पन्हाळा : १२, कागल व राधानगरी प्रत्येकी : ११, गगनबावडा ०७, शाहूवाडी : ०५, भुदरगड ०३.