शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शाहूवाडी, पन्हाळ्यात औषधी वनस्पती संशोधन केंद्र करा - धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:23 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्यांत बहुतांशी वनक्षेत्रात दुर्मीळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्यांत बहुतांशी वनक्षेत्रात दुर्मीळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व प्रक्रिया केंद्र स्थापन करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली.

हा भाग ‘युनेस्को’चा जागतिक वारसा असणाऱ्या पश्चिम घाटमाथ्याच्या अंतर्गत येतो. त्याचप्रमाणे जगातील पहिल्या आठ जैविक विविधता हॉटस्पॉट साईटमध्येही याचा समावेश आहे. या भागात कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नरक्या, मधुमेहाच्या उपचारात वापरण्यात येणारे सप्तरंगी, डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी गिलोही, आयुर्वेदातील औषधांची राणी मानली जाणारी ‘शतावरी’, शिकाई, गुळवेल, रानहळद आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो. या वनस्पतींची गुणवत्ता व उपलब्धता पाहून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व विकास केंद्राची स्थापना करावी. औषध निर्मितीस प्रोत्साहित करून राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुर्वेद रुग्णालय सुरू करावे. अशी आग्रही मागणी खासदार माने यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.