लोकमत न्यूज नेटवर्क
नृसिंहवाडी : छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक घडवले. त्यांच्याच विचारांचा वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यांनी गेल्या पावणेदोन वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहोचविण्यासाठी ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पाटील, राजाराम सुतार, जिल्हाप्रमुख, ‘गोकुळ’चे संचालक मुरलीधर जाधव उपस्थित होते.
स्वागत वैभव उगळे यांनी केले. यावेळी मंगला चव्हाण, मनिषा पवार, बाबासाहेब सावगावे, नामदेव गिरी, महादेव गौड, दत्ता पवार, बाबासो पाटील, शिवाजी पाटील, रेखा जाधव, संतोष धनवडे, श्रेनिक माने, सुनील धनवडे, चेतन गवळी, धनाजीराव जगदाळे, शिवराज धनवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन आण्णासाहेब बिलोरे यांनी केले तर प्रतीक धनवडे यांनी आभार मानले.
फोटो - १४०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण दुधवडकर, उल्हास पाटील, वैभव उगळे, मुरलीधर जाधव, राजाराम सुतार उपस्थित होते.