शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

बालकामगार कायद्यातील सकारात्मक दुरुस्ती करा

By admin | Published: May 16, 2015 12:12 AM

स्वाभिमानी बालहक्क अभियानाची मागणी : उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन

कोल्हापूर : बालकामगार कायद्यातील सकारात्मक दुरुस्ती व्हावी आणि शिक्षण हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी स्वाभिमानी बालहक्क अभियानच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी स्वीकारले. देशातील बालकामगारांची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी बालकामगार कायद्यात सकारात्मक दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाने बालकामगारांचे वय १८ वरून १४ पर्यंत खाली आणले. शिक्षण हक्क व काल अधिनियम कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोरपणे ६ ते १४ या वयोगटांतील अंमलबजावणी व्हावी तसेच बालकामगार काायदा दुरुस्ती करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मतदान, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाहाची मान्यता १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मान्यता मिळते तर मग बालकामगारांचे वयदेखील १८ वर्ष असणे आवश्यक आहे. १८ वरून १४ वय करण्याचा शासनाचा हेतू संशयास्पद दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बदलामुळे मुलांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करू नये, मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण सरकारमुळे मिळते त्यामुळे धोकादायक व बिगर धोकादायक अशी उद्योगाची विषमता करू नये, शिक्षण हकक कायदा ६ ते १८ वर्षे वयोगटापर्यंत करण्यात यावा, अशा सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळात अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, जैनुद्दीन पन्हाळकर, सुलभा माने, शरयू भोसले, सुनीता भोसले, वनिता कांबळे, अमोल कवाळे, मनिषा पोटे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)