लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दुतोंडी भूमिका घेत असाल तर कार्यालयाला कुलूप घालू, खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा देत कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संपत अबदार यांची सोमवारी कोंडी केली. त्यावेळी अबदार यांनी, आंदोलकांची हात जोडून दिलगिरी व्यक्त केली. ‘मी आंदोलनाठिकाणी येऊन चूक केली, राजीनामा देऊन मी खुर्ची खाली करतो’ असे सांगत चुकीबाबत पश्चात्ताप व्यक्त केला.पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट बांधकामाबाबत शासकीय अधिकारी चुकीची माहिती देत नागरिकांची दिशाभूल करीत असल्याच्या आरोप करीत सोमवारी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम (राष्टÑीय महामार्ग) विभागाचे उपकार्यकारी अभियंता अबदार यांना धारेवर धरले.नागरी कृती समितीच्यावतीने शुक्रवारी ‘जबाब दो’ आंदोलनावेळी शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडगावे यांना जाब विचारला होता, त्यावेळी अबदार यांनी पुलाला अडथळा आणण्यासाठी झाडे तोडण्यास दिलीप देसाई यांनी विरोध केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसºया दिवशी त्यांनी या प्रकरणाचा दिलीप देसाई यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचा लेखी खुलासा केला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अबदार यांना घेरावो घालत जाब विचारला. अबदार यांनी, ‘मी देसाई व उदय गायकवाड यांचे नाव घेतले नसल्याचे प्रथम सांगितले.’ त्यावेळी त्यांना धारेवर धरले.उदय गायकवाड व अनिल चौगुले यांनीही अबदार यांनाही धारेवर धरले. गायकवाड यांनी पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेता ‘कँटिलिव्हर’ (हेरिटेजपासून पुढे ४० फुटाबाहेर पण मनपाच्या जागेत पुलाचा नवा खांब व पुढे रस्ता) पद्धतीने बांधकाम पूर्ण करता येते, असा पर्याय सुचविला. अबदार यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून सोमवार (दि. २३) थेट पुलावर तंत्रज्ञासोबत उपस्थित राहावे, असे बजावले. यावेळी अशोक पोवार, बाबा पार्टे, रमेश मोरे, किशोर घाटगे, दिलीप माने, जयकुमार शिंदे, दिलीप पवार, तानाजी पाटील, चंद्रकांत बराले, महादेव पाटील उपस्थित होते.आंदोलनाशी संबंध नाहीशिवाजी पूलप्रश्नी शुक्रवारच्या आंदोलनाशी माझा संबंध नाही,चूक केली, मी तेथे आलो. मी दिलीप देसाई, उदय गायकवाड, अनिल चौगुले यांचे नाव घेतले नाही, असा खुलासा उप कार्यकारी अभियंता अबदार यांनी करताच आंदोलक त्यांच्यावर तुटून पडले. तुमचा संबंध नव्हता तर तुम्ही तेथे कशाला आला, तुम्ही अंगावर घेऊन प्रश्नांची उत्तरे का दिलीत, असाही जाब विचारला. आंदोलकांचा रूद्रावतार पाहून अबदार यांनी चक्क त्यांच्यासमोर हात जोडून ‘मी चुकीची माहिती दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
चूक केली, खुर्ची खाली करतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:27 AM