लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : शिक्षणाच्या माध्यमातून नवी सुसंस्कृत पिढी निर्माण करणे आवश्यक आहे . आदर्श विद्यार्थी घडविणे ही देशसेवाच आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले. १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या गावातील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराच्या आयोजित उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच युवराज दिंडे होते.
आमदार आसगावकर म्हणाले, ग्रामीण भागातील शेवटच्या थरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.
प्रारंभी शाळेच्या १९९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस भेट दिली. यावेळी प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच युवराज दिंडे, सरदार पाटील, सुनील बचाटे, शिवाजी गोसावी, म्हारूळ गावच्या सरपंच वंदना म्हाकवेकर, सागर चौगले , सुवर्णा दिंडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक जयवंत हावलदार यांनी केले. सागर दिंडे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ १८ बहिरेश्वर इंग्लिश स्कूल
बहिरेश्वर (ता. करवीर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच युवराज दिंडे, सरदार पाटील, सुनील बचाटे, शिवाजी गोसावी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.