मलकापूर : मलकापूर शहराने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सहावा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. ही माहिती समजताच पालिका पदाधिकारी व कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला.केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये देशातील ४०४४ शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेत मलकापूर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ मोहिमेत पालिका पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शाळा, कॉलेज, महिला बचत गट, सामजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध पक्ष, संघटना, नागरिक, शेतकरी, व्यापारी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. त्यामुळे स्वच्छता अभियानाची जनजागृती केली होती.
नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी पालिकेच्या वतीने व लोकसहभागातून घरोघरी डस्टबीनचे वाटप करण्यात आले होते. तसेच घंटागाडीद्वारे घरोघरी दररोज ओला व सुका कचरा संकलित करण्यात येऊन पालिकेने कचºयावर प्रक्रिया करण्यात येऊन सेंद्रिय खतनिर्मिती केली होती.अभियान यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकारी अॅलीस पोरे, नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नियोजन मंडळाचे सदस्य नगरसेवक राजू प्रभावळकर, कर्मचारी महेश गावखंडकर, आबा पडवळ, प्रसाद हार्डीकर, आदींसह पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व नागरिक यांनी सहकार्य केले.तकारीसाठी स्वच्छता अॅपपालिकेने नागरिकांच्या स्वच्छतेबाबतीत तक्रारीसाठी स्वच्छता अॅप तयार केले होते. त्यावर आलेल्या नागरिकांच्या तक्रारी निर्गत केल्या जात होत्या. पालिकेने शहरातील जमा झालेल्या कचºयावर उचत येथील कचरा डेपोवर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती केली. त्या खताची विक्री करून पालिकेने उत्पन्न मिळविले. ओल्या कचºयावर सेंद्रिय पद्धतीने खत प्रकिया करण्यासाठी कंपोस्ट पीठ उभारण्यात आले आहेत. तसेच पालिकेने शंभर वर्षांपूर्वीच्या कचºयावर प्रक्रिया करून कचरा डेपोत सुंदर बाग तयार केली आहे.