मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या महापुरात व्यापाऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मलकापूर, येळाणे, बांबवडे, करंजपेण या बाजारपेठेचा समावेश आहे. पुराच्या पाण्यामुळे चिखलांनी भरलेली दुकाने व्यापारी साफ करीत आहेत.
तालुक्यात मलकापूर, बांबवडे दोन प्रमुख बाजारपेठा आहेत. त्या खालोखाल करंजपेण, येळाणे यांचा समावेश होता. बुधवारी ढगफुटी सदृश पावसामुळे उद्भवलेल्या महापुरात कोट्यवधीचे नुकसान झाले. व्यापारी घटकांना मोठी झळ बसली आहे. कडवी, शाळी, कासारी , अंबिरा या नद्यांना आलेल्या महापुरात बांबवडे , मलकापूर , येळाणे , करंजपेण बाजारपेठेत पुराचे पाणी मध्यरात्री दुकान जाऊन व्यापाऱ्याचा माल पाण्यात बुडाला. वारंगे कॉम्पलेक्स मधील दुकान गाळे , वारंगे मॉल्स , शिवम फर्निचर अशा अनेक मोठ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले . फर्निचर , सिमेंट पोती , हार्डवेअर सामान , कपडे, किरणा मालाचे नुकसान झाले . महसूल विभागाने तातडीने पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.