कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तरुणाला अटक केली. राजेश बबन वाघमारे (वय २३, रा. गोकुळ शिरगाव, करवीर) असे त्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती, शहरातील एका अल्पवयीन मुलीला दि. २७ फेब्रुवारीला संशयित राजेश वाघमारे याने फूस लावून तिचे अपहरण केले. कर्नाटकात नेऊन तिच्यावर दि. ५ मार्चअखेर अत्याचार केले. याबाबतची फिर्याद पीडितेच्या नातेवाइकांनी राजारामपुरी पोलिसांत दिली होती. त्यानुसार संशयित वाघमारेवर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला बुधवारी (दि. ११) सायंकाळी अटक केली. याबाबतची कारवाई पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बी. बी. शिंदे, पोलीस शिपाई संजय जाधव यांनी केली.