लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारने डिसेंबर १५ पासून आतापर्यंत केलेली दुधाच्या खरेदी दरातील वाढ पाहता ‘गोकुळ’ने गाय उत्पादकांच्या ३ रुपये ३० पैसे, तर म्हैस उत्पादकांच्या १ रुपया ३० पैशांवर डल्ला मारला आहे, असा आरोप करीत संघाचे व्यवस्थापन लबाड असून, सीमाभागातील संस्था व उत्पादक संचालकांचे मतदार नसल्यानेच दरकपात करून व्यवस्थापनाने त्यांच्यावर अन्याय केल्याची टीका ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील (शिरोळ) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
शासनाने डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत वारंवार केलेल्या दूध खरेदी दरवाढीपैकी ‘गोकुळ’ने गाईच्या दुधाचे ३.३० पैसे, तर म्हशीच्या दुधाचे १.३० पैसे अद्याप दिलेले नाहीत. एकीकडे दुधाचे पैसे कमी करायचेआणि दुसरीकडे पशुखाद्याच्यादरात भरमसाट वाढ करण्याचा उद्योग करून व्यवस्थापनाने शेतकºयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे.
‘गोकुळ’ दुधाची मागणी व जिल्ह्णातील उत्पादन पाहून सीमाभागासह शेजारील जिल्ह्णांतून दूधसंकलन सुरू केले. ‘संघाशी संलग्न दूध संस्थांप्रमाणे सोई-सुविधा देतो; पण दूध घाला,’ अशी विनवणी संचालकांनी केली. आता दरवाढ करताना त्यांच्यावर अन्याय केला जातो. अगोदरच कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होतोय आणि आता ही मंडळीही अन्याय करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही. सर्वसाधारण सभेपूर्वी मागील फरकासह सीमाभागातील उत्पादकांना दरवाढ केली नाही तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.
पावडर व बटरचे दर घसरल्याने गाईच्या दुधाचे दर कमी केल्याचे सांगितले जाते; पण अशा काळातील नुकसान भरून काढण्यासाठी संघाकडे कोट्यवधी रुपयांचा चढउतार निधी आहे. हा निधी कोठे गेला? असा सवाल करीत मार्च २०१४ च्या ताळेबंदात पशुखाद्य विभाग नऊ कोटींनी नफ्यात होता, त्यावेळी पोत्यामागे ७५ रुपये कमी करण्यासाठी आपण आग्रही होतो; पण कारभाºयांनी त्याला विरोध केल्याचे पाटील यांनी सांगितले.आठ महिन्यांत साडेचार रुपये दरवाढआपण अध्यक्ष झाल्यानंतर आठ महिन्यांत तीन वेळा प्रतिलिटर साडेचार रुपयांची दूध दरवाढ केली. त्याचबरोबर प्रत्येक वेळी प्रतिलिटर ५० पैसे संघाकडे चढउतार निधी राखीव ठेवला. जोखीम घेऊन दरवाढीचा निर्णय घेतल्याने केवळ कोल्हापुरातील नव्हे तर राज्यातील दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपये मिळाले; पण विद्यमान अध्यक्षांनी सूत्रे घेताच गाईच्या दुधाचा दर दोन रुपयांनी कमी केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
तुलना‘अमूल’शी करापंचवीस वर्षे सरकारच्या दरापेक्षा जादा दर दिला. मग आता मागे का? सरकारपेक्षा जादा दर देऊन पुरुषार्थ दाखवा. इतर कमकुवत संघांशी तुलना करण्यापेक्षा ‘अमूल’शी करा, असे आव्हान पाटील यांनी दिले.मुश्रीफ-बंटींना विचारूनच पोलखोल‘गोकुळ’च्या कारभाराबाबत अनेक मुद्दे माझ्याकडे आहेत. आताच सगळे खुले करणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करूनच सर्वसाधारण सभेत सत्तारूढ मंडळींच्या कारभाराचा पोलखोल करू, असा इशाराही पाटील यांनी दिला.