पत्रकात म्हटले आहे, शहरातील भैरी रोडवरील मारुती मंदिर, भीमनगर कमानीच्या आतील बाजूस, निलकमल हॉटेलसमोर, नदीवेस पारकट्टा, एम. आर. हायस्कूल परिसर, शिवाजी विद्यालय व रेस्ट हाऊसपरिसर, भगवा चौक रिक्षा स्टॉप परिसर, आजरा रोडवरील डॉ. घाळी पुतळा परिसर, सरस्वती नगरातील खुली जागा, राधाकृष्ण मंदिर अर्बन कॉलनी, अयोध्यानगर कॉर्नर, मुलींचे हायस्कूलजवळचे मैदान, मांगलेवाडी बीएसएनएलचे ऑफिसजवळ, हाळलक्ष्मी मंदिर, धनगर मंदिर, संकल्पनगर या १७ ठिकाणी भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
वरील ठिकाणांसह भडगांव रोडवरील भाजी मंडई, दसरा चौकातील फळ विक्रीचे ठिकाणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी भाजीपाला खरेदी-विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
खरेदी-विक्रीच्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसेच सुरक्षित अंतर ठेवून व्यवसाय करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.