शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

मंडलिक गटाचे ६५ ठराव दाखल

By admin | Published: February 04, 2015 12:46 AM

गोकुळ दूध संघ निवडणूक : आज शेवटचा दिवस; १९१ ठराव शिल्लक

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे कागल तालुक्यातील ठराव थेट सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात दाखल केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक व कागलचे उपसभापती भूषण पाटील यांनी ६५ ठराव दाखल केले. जिल्ह्यातून मंगळवारी ४७७ ठराव दाखल झाले असून आज, बुधवारी ठराव दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदारयादी तयार करण्यासाठी संलग्न दूध संस्थांचे ठराव दाखल केले जात आहेत. सोमवारी विद्यमान संचालकांसह काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले होते. आज तब्बल ४७७ ठराव दाखल झाले. सर्वाधिक १०२ ठराव राधानगरी तालुक्यातून दाखल झाले. अजून १९१ ठराव दाखल व्हायचे असून आज, बुधवारी ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिल्लक ठरावांमध्ये सर्वाधिक ठराव राधानगरी तालुक्यातील ६४ राहिले आहेत. त्यानंतर चंदगडमधील ३२, करवीरमधील २९ तर भुदरगडमधील १७ ठराव अजून दाखल व्हायचे आहेत. गडहिंग्लज १०, पन्हाळा १६, शाहूवाडी ९, कागल २, शिरोळ ४, हातकणंगले ३ व आजरा २ ठराव दाखल व्हायचे आहेत. (प्रतिनिधी)दुबार ठरावधारकांवर कारवाई सहकार प्राधिकरणाच्या सूचनेनुसार संस्थांनी आपला प्रतिनिधी देताना एकच देणे बंधनकारक आहे पण दाखल झालेल्या ठरावांमध्ये काही दुबार असल्याचे निदर्शनास आले आहेत, संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्याची पडताळणी करणार असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर फौजदारी दाखल करणार असल्याची माहिती विभागीय उपनिबंधक (दुग्ध) दिग्विजय राठोड यांनी दिली. भूषण पाटील यांनी घेतली महाडिक यांची भेट माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे कट्टर समर्थक व उपसभापती भूषण पाटील यांनी सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केल्यानंतर ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात जाऊन आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. बाबा देसाई यांचेही ठराव दाखल भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी मंगळवारी आपल्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ठराव साहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांची चर्चा झालेली आहे. मंत्री पाटील सांगतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंगळवारी दाखल झालेले ठराव; कंसात एकूणकरवीर- ९० (५५५)आजरा -७ (२१३)भुदरगड - ७४ (३४१)चंदगड - १८ (२९१)कागल - ७० (३४८)शाहूवाडी - ५६ (२३२)शिरोळ - ० (११३)पन्हाळा - १६ (२४९)राधानगरी - १०२ (३५२)गगनबावडा - १९ (६१)हातकणंगले -४ (७३)गडहिंग्लज -२१ (२४०)