अनिल पाटीलमुरगूड : कागलच्याराजकारणात सक्रिय झाल्यानंतर माझे एक मित्र झाले...अंबरीश दादा, मी त्यांच्याशी सच्ची मैत्री केली पण त्यांनी माझ्यातील कधीच मित्रत्व पाहिलं नाही नेहमी शत्रुत्व केलं. तालुक्यातील दुसरे एक नेते आहेत त्यांनी काय माझ्याशी कधी मैत्री केली नाही मी काय त्यांच्याशी मैत्री केली नाही. पण सद्या समरजित घाटगे यांच्या रूपाने मला मोठा भाऊ एक सच्चा मित्र मिळाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगून समरजितजी आप आगे बडो...हम आपके साथ है असे सूचक वक्तव्य करून वीरेंद्र मंडलिक यांनी भविष्यातील मंडलिक राजे गटाच्या मनोमिलणाची कवाडे उघडी केली.शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचे होम टाऊन असलेल्या शिंदेवाडी ता. कागल येथील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भविष्यात कागलच्या राजकारणात मंडलिक आणि राजे गट एकत्र राहतील असे सूतोवाच केले. घाटगे यांच्या होम टाऊनमध्ये पन्नास वर्षांपूर्वी सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे एकत्र व्यासपीठावर आले होते. आज आपण त्यांचे वंशज ऐतिहासिक कार्यक्रमात एकत्र आलो आहोत. आपण शाहू कारखान्याला आदर्श मानून कार्य करत असून प्रगती करताना चांगल्याशी म्हणजेच शाहू कारखान्याशी तुलना करून मंडलिक कारखान्यात कारभार करत असल्याचे त्यांनी सांगितले.आजोबा स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याबरोबर जिल्हा फिरताना लोकांनी दाखवलेलं प्रेम पाहून मी राजकारणात यायचा निर्णय घेतला. मागील वर्षी मुरगूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम हा कायम स्मरणात राहील असा झाला. समरजित घाटगे यांचे गाव असलेले हे शिंदेवाडी गाव आमचं कधीच झालं नाही यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले पण दत्तमामा खराडे म्हणजेच पर्यायाने राजे गटाने या गावावर एक हाती सत्ता कायम ठेवली आहे आतापर्यंत या गावासाठी सुमारे ९५ लाखाचा निधी आपण दिला भविष्यात ही मोठा निधी देण्याचे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.भाषणाच्या शेवटी या कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक येणार होते ते कामानिमित्त बाहेर गेल्याने येऊ शकले नाहीत पण ही कामे पूर्ण झाल्यानंतर उदघाटना च्या कार्यक्रमाला त्यांना आणण्याची जबाबदारी ही वीरेंद्र मंडलिक यांनी बोलून दाखवली.
कोल्हापुरातील कागलमध्ये मंडलिक-राजे गटाचे मनोमिलन; वीरेंद्र मंडलिक म्हणाले, समरजितजी आप आगे बडो...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 5:55 PM