रंकाळा परिसरात राहणारा सत्यजित हा स्थापत्य अभियंता, तर मारशा ही वास्तुविशारद आहे. दोघेही एकमेकांना बारा वर्षांपासून ओळखत असल्याने त्यांनी १९ मार्च २०२१ ला एका हाॅटेलमध्ये एकाच वेळी मौलानांच्या उपस्थितीत मुस्लिम पद्धतीने निकाह केला. त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टका, सप्तपदी विधी झाला. दोघांच्याही कुटुंबीय पुरोगामी विचारांचे असल्याने या विवाहास संमती दिली. त्यामुळे सामाजिक दबावाचा कुठलाही प्रकार येथे घडला नाही. घरातल्या वडीलधाऱ्यांच्या संमतीनेच हा विवाह करण्याचे दोघांनी ठरविले आणि त्याप्रमाणे विवाह थाटामाटात पार पडला.
दोन्ही कुटुंबीय उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी धर्मभेद कधीच मानला नाही. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या दोन्ही कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मारशाचे आजोबा १९६८ साली तत्कालीन नगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांनी कुष्ठपीडितांना शेंडा पार्कात सुविधा मिळवून देण्यासाठी चिपको आंदोलन केले होते. त्याची चर्चा राज्यभरात झाली होती. याबाबत मुलीचे वडील नदीम मुजावर यांनी माणुसकी हाच धर्म आहे. त्यामुळे वडीलधाऱ्यांनी सर्व जातिधर्माच्या लोकांचा आदर करण्याची शिकवण दिली. त्यामुळे मानवता हा एकच धर्म आम्ही मानतो, अशी प्रतिक्रिया दिली.
फोटो : ०१०४२०२१-कोल-वेडिंग,
आेळी : कोल्हापुरातील सत्यजित यादव व मारशा मुजावर यांनी एकाच मंडपात मंगलाष्टका व निकाह कबूल असा दुहेरी संगम साधत विवाह केला.
फोटो : ०१०४२०२१-कोल-वेडींग०२
ओळी : कोल्हापुरातील सत्यजित यादव व मारशा मुजावर यांनी एकाच मंडपात मंगलाष्टका व निकाह कबूल असा दुहेरी संगम साधत विवाह केला. त्यानंतर बग्गीतून वरात काढली.
===Photopath===
010421\01kol_11_01042021_5.jpg
===Caption===
फोटो : ०१०४२०२१-कोल-वेडींग, आेळी : कोल्हापूरातील सत्यजित यादव व मारशा मुजावर यांनी एकाच मंडपात मंगलाष्टीका व निकाह कबुल असा दुहेरी संगम साधत विवाह केला. फोटो : ०१०४२०२१-कोल-वेडींग०२आेळी : कोल्हापूरातील सत्यजित यादव व मारशा मुजावर यांनी एकाच मंडपात मंगलाष्टीका व निकाह कबुल असा दुहेरी संगम साधत विवाह केला. त्यानंतर बग्गीतून वरात काढली.