अभय व्हनवाडे रुकडी-माणगाव: माणगाव ग्रामपंचायतींच्या थकबाकीपोटी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील साहित्य ग्रामपंचायताने जप्त केले. जप्त साहित्य मध्ये कार्यालयातील लोखंडी सह प्लास्टिक खुर्ची, कपाट, तिजोरी, टेबलचा समावेश आहे. कारवाईचे लेखी नोटीस देवून ही सहाय्यक अभियंता कदम हे वेळेत हजर न झाल्याने कारवाईस विलंब झाला.माणगाव येथील म.रा.वि.वि कार्यालयाकडून स्थानिक करापोटी 16 लाख रू येणे आहे. सदरचे कर भरणे बाबत २०१५ पासून ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. पंरतू विद्युत वितरण कार्यालय सदरचे कर भरणे ऐवजी स्थानिक दिवाबत्तीचे थकबाकी ग्रामपंचायतने भरावे याकरिता तगादा लावला. विद्युत वितरण कंपनी ग्रामपंचायतचे स्थानिक कर भरणे बाबत असमर्थता दर्शविताच. ग्रामपंचायत विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात न्यायालयीन दावा दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने ग्रामपंचायतीस थकीत कर वसूल करण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.न्यायालयीन दिलेले आदेश व ग्रामपंचायतीस असलेला अधिकारतंर्गत वसूलीची कारवाई करण्यात आली. वसूली पथकामध्ये सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या जोग, पोलीस पाटील करसिध्द जोग, तलाठी सोमनाथ शिंदे, माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, संजय उपाध्ये, अविनाश माने, लिपिक मायाप्पा रुपणे, प्रशांत तांदळे सह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, सदस्य उपस्थित होते.
कारवाईबाबत महवितरण कंपनी ,जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयास कळविणेत आले होते. महावितरण कंपनीने थकवलेला जवळपास 16 लाख रुपये कर जर भरला नाही तर जप्त केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव करून उर्वरित मालमतेवर ग्रामपंचायतीचा बोजा नोंद करून सदरची थकबाकी ही महाराष्ट्र जमीन महसूलच्या नियमानुसार थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. - राजू मगदूम, सरपंच , ग्रामपंचायत माणगाव
स्थानिक कर भरणे बाबतचा अधिकार मुख्य कार्यालयाच्या अखत्यारीतील आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आली आहे. - उमेश कदम, सहाय्यक अभियंता,म.रा.वि.वि .कंपनी