शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

मैनुद्दीन मुल्लाकडून सोळा लाखाची प्रॉपर्टी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:58 PM

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (वय ३४, रा. जाखले, ता. पन्हाळा) याचे ताब्यातून सोळा लाख किंमतीची वाहने, सोन्याचे दागिने सीआयडीने हस्तगत केली.या गुन्ह्यात शुक्रवारी अटक केलेल्या हवालदार शंकर महादेव पाटील (५२) याच्या चिंचोली (जि. सांगली) येथील घरावर शनिवारी सीआयडीच्या ...

ठळक मुद्देशंकर पाटीलच्या चिंचोली येथील घराची झडतीसहायक फौजदार कुरळपकर फरारसोळा लाख किंमतीची वाहने, सोन्याचे दागिने हस्तगत

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (वय ३४, रा. जाखले, ता. पन्हाळा) याचे ताब्यातून सोळा लाख किंमतीची वाहने, सोन्याचे दागिने सीआयडीने हस्तगत केली.

या गुन्ह्यात शुक्रवारी अटक केलेल्या हवालदार शंकर महादेव पाटील (५२) याच्या चिंचोली (जि. सांगली) येथील घरावर शनिवारी सीआयडीच्या पथकाने छापा टाकुन झडती घेतली. यावेळी बँक खात्यासह स्थावर मालमत्तेची महत्वपूर्ण कागदपत्रके हाती लागले आहेत. या गुन्ह्यातील शेवटचा संशयित सहायक फौजदार शरद कुरळपकर हा फरार आहे, त्याला लवकरच अटक केली जाईल. अशी माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने १४ कोटी ३४ लाख ५१ हजार रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षकांसह सात जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी सीआयडीने संशयित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहा. पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, पोलिस हवालदार दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शंकर पाटील यांच्यासह मोहीद्दीन मुल्ला याला अटक केली. घनवट, चंदनशिवे व त्याच्या सहकाºयांनी तपासासाठी मुल्ला याला वारणानगर येथे आणले.

येथील शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नंबर पाचमधील रूममध्ये त्यांना आणखी ११ कोटी रुपये मिळाले. मैनुद्दीनच्या नावाखाली चोरी दाखवून घनवट व सहकाºयांनी ३ कोटी १८ लाख रुपये परस्पर घेतले तर सहा. पोलिस निरीक्षक चंदनशिवे व सहकाºयांनी ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईक प्रवीण सावंत यांच्या बँक खात्यावर भरले. या सर्वांनी मिळून एकूण ९ कोटी १८ लाखांचा ढपला पाडला. चौकशीमध्ये त्यांनी या सर्व प्रकरणाची कबुली दिली आहे. मैनुद्दिनच्या ताब्यातून सोळा लाखांची प्रॉपर्टी सीआयडीने जप्त केली.

सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. शंकर पाटील हा सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या राहत्या घराची शनिवारी झडती घेतली. त्याचा या गुन्ह्यामध्ये कोणता रोल होता याची माहिती पोलीस घेत आहेत. या गुन्ह्यातील शेवटचा आरोपी संशयित सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर हा फरार आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल असे पाठक यांनी सांगितले.