पन्हाळा तालुक्यात कोरोना संकटामुळे लहान बालकांचेकडे त्यांचे पालक आवश्यक लक्ष देत नाहीत. त्यामुळे पन्हाळा पंचायत समितीच्या एकात्मिक बाल सेवा विभाग आणी अंगणवाडी या माध्यमातून बालकांना आहार देण्याची योजना सुरू आहे. तथापि नुकत्याच चाचणी केलेल्या अहवालानुसार तालुक्यात सुमारे ६२५ बालके कमी वजन भरल्याने कुपोषित आढळूून आली आहेत. यात ७३ बालके अती तीव्र वजन कमी असलेली आहेत.
यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दत्तक पालक योजना सुरू केली. या योजनेकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली. त्यामुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दत्तक पालक योजनेमध्ये सहभाग घेत कुपोषित बालकांना दत्तक घेतले आहे. पन्हाळा तालुक्यामध्ये १५ हजार ५५१ बालकांच्या सर्वेक्षणातून ७३ बालके अतितीव्र कुपोषित, ५०३ बालके मध्यम कुपोषित आढळून आली आहेत. तालुक्यातील कुपोषित बालकांना आहार अंडी,फळे, प्रोटीनयुक्त पावडर देण्यासाठी एकात्मिक बाल विकास केंद्राच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापि हा सकस आहार अद्याप दिला गेला नाही. कुपोषण मुक्तीमध्ये अंगणवाडी केंद्राचा सहभाग परिणामकारक असतो. कोरोना साथीमुळे मार्च महिन्यापासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत. सध्याच्या काळात बालक कुपोषणापासून मुक्त व्हावे यासाठी पालकांनी वैयक्तिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.