शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

बामणी घारीच्या पंखात अडकला मांजा, अग्निशमन दलाकडून सुटका

By संदीप आडनाईक | Published: December 19, 2022 4:00 PM

घारीला सुखरुप सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने काल, रविवारी सकाळी मांजात अडकलेल्या बामणी घारीला सुखरुप सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले.रंकाळा परिसरातील राजकपूर पुतळ्यानजिक आर. के. गॅरेजजवळील दाट झाडीत चिंचोळ्या जागेत एक बामणी घार पतंगाच्या मांजा दोरीत अडकली होती. पूर्णवाढीच्या या घारीचा आपल्या जोडीदारासह अधिवास आहे. आरके गॅरेजमधील एका कामगाराला या घारींपैकी एका घारीच्या पंखात मांजा दोरा गुंडाळल्यामुळे जागेवरच थांबून असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ टिंबर मार्केट परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात कळविले. तेथील स्टेशन मास्टर दस्तगीर मुल्ला यांनी तत्काळ एक वाहन घटनास्थळी पाठविले. पक्षीप्रेमी नाना नामजोशीही तेथे पोहोचले.

चालक सनी पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, ज्या जागेत घार अडकून पडली होती, ती अतिशय चिंचोळी आणि घनदाट झाडी असल्याचे लक्षात आले. त्या जागेत गाडी जात नसल्यामुळे घारीची सुटका करणे कठीण होत होते. त्यामुळे गॅरेजमधील पोखलँडच्या बास्केटमध्ये बसून एका जवानाने घारीजवळ पोहोचत तिची सुटका केली.सुदैवाने पंखाच्या टोकाला मांजा दोरा गुंडाळल्यामुळे आणि तिने कोणतीही हालचाल न केल्यामुळे घार फारशी जखमी झाली नसल्याचे तपासणीत लक्षात आले. या घारीचा जोडीदार त्याच जागी असल्यामुळे जवानांनी तिला त्याच जागी असलेल्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या मोहिमेत टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलाचे चालक सनी पटेल, संग्राम मोरे, बाबुराव सणगर यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर