शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्रिकेटच्या सट्टेबाजीतून अनेकजण बनले ‘सम्राट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजाराचे प्रमुख केंद्र म्हणून अलीकडे शहरातील शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर हा परिसर आणि इचलकरंजी शहरांची ओळख वाढू लागली आहे. या केंद्रामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. बेटिंगमध्ये मटका व्यवसायामध्ये ‘सम्राट’ झालेल्या अनेक राजकीय बड्या धेंड्यांचा समावेश आहे. त्यांचे थेट मुंबईपर्यंत ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजाराचे प्रमुख केंद्र म्हणून अलीकडे शहरातील शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर हा परिसर आणि इचलकरंजी शहरांची ओळख वाढू लागली आहे. या केंद्रामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. बेटिंगमध्ये मटका व्यवसायामध्ये ‘सम्राट’ झालेल्या अनेक राजकीय बड्या धेंड्यांचा समावेश आहे. त्यांचे थेट मुंबईपर्यंत सट्टाबाजाराचे कनेक्शन असून, मोबाईलवरून बेटिंग घेण्यासाठी शहरासह उपनगरांत पंटर पेरलेआहेत.कोल्हापूर शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टाबाजार सुरू असल्याचे शाहूपुरीतील कारवाईने स्पष्ट झाले आहे. या सट्टाबाजाराचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलिसांच्या गोपनीय हालचाली सुरू आहेत. क्रिकेट सट्ट्याचे मुख्य केंद्र शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगरसह इचलकरंजी शहरात आहे. येथून थेट मुंबई असे बेटिंगचे कनेक्शन आहे. क्रिकेट बेटिंगमध्ये सट्टा खेळण्यासाठी काही बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी घरी बसून एजंटांद्वारे मोबाईलवरून सट्टा लावीत असतात. येथील पंटरांचा मुंबईतील बुकीमालकांशी थेट संपर्क असल्याने शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर, इचलकरंजी केंद्रातून बेटिंगची सूत्रे हलविली जात आहेत. पोलीस रेकॉर्डवरील पंटर शहरासह उपनगरांत विखुरलेले आहेत. शहरातील अनेक बडी धेंडे मटका, जुगारातून ‘सम्राट’ बनली आहेत. काही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांशी सलगी वाढवून त्यांनी आपल्या व्यवसायाचा चांगलाच जम बसविला आहे. पोलिसांनी या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळल्या, तरच सट्टाबाजारासह अवैध धंदे पूर्णत: बंद होणार आहेत.क्राईम ब्रँच कारवाई करणार का?क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजारातील बड्या धेंडांची नावे पोलिसांना माहिती आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणी करीत नाही. सट्टाबाजाराची पाळेमुळे उखडून टाकण्याची जबाबदारी क्राईम ब्रँचकडे आहे. या पथकातील प्रमुखांसहसहकारी या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याचेधाडस करणार का? अशी चर्चा नागरिकांत आहे.बारा कोटींची उलाढालआयपीएल क्रिकेट बेटिंगचे कोल्हापूर, पुणे, नागपूर, गुजरात, मुंबई ते दुबई असे कनेक्शन आहे. कोल्हापूर शहर, गांधीनगर व इचलकरंजी येथून सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची पोलीस दलात चर्चा आहे.हॉटेल, लॉजची झाडाझडतीक्रिकेट सट्टा जोमाने सुरू असल्याची चाहुल लागल्याने पोलिसांनी कमालीची दक्षता घेतली आहे. पैशांची लूट होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस प्रत्येक पंटरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. हद्दीनुसार लॉज, हॉटेलसह काही अपार्टमेंटची झाडाझडती सुरू आहे.आयपीएल क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर पैशांची लूट होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार लॉज, हॉटेलसह काही अपार्टमेंटची झाडाझडती घेण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत.- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक