कोल्हापूर : चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, असा निर्वाणीचा इशारा गुरुवारी कोल्हापुरात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेत मराठा नेत्यांनी दिला. शांततेत मूक मोर्चे काढले. आता हा विराट ठोक मोर्चा काढला. एवढे करूनही सरकारला जाग येईल, असे वाटत नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, पुढच्या तयारीला लागा. आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असे सांगून शाहू छत्रपती यांनी पुढील रणनीती जाहीर केली. यावेळी सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली.
ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. सर्वत्र भगवे ध्वज फडकत होते. ‘जय भवानी..जय शिवाजी’च्या घोषणा आणि भगवे वातावरण यामुळे वातावरणात एक वेगळेच स्फुरण चढले होते. गुरुवारच्या मोर्चाने १५ आॅक्टोबर २०१६ ला काढण्यात आलेल्या मूक मोर्चाची आठवण ताजी झाली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच गावागावांतून हातात भगवे झेंडे घेतलेले युवक मोटारसायकलवरून यायला सुरुवात झाली. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर चार वीरमातांच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्टÑगीत, शाहू गौरवगीत, महाराष्टÑगीत व मराठा आरक्षणगीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. महापौर शोभा बोंद्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, उपमहापौर महेश सावंत, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार मालोजीराजे, समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी शाहू छत्रपती म्हणाले, ‘आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावा लागेल. कारण केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व मुस्लिम, मागासवर्गीय अशा सर्व समाजांनी पाठबळ दिले आहे. सरकारने आरक्षणप्रश्नी आमचा संयम पाहिला आहे. आम्ही संयमी आहोत, याचा अर्थ कमजोर आहोत हे समजू नये. आरक्षण देण्याचे सरकारच्याच हातात आहे. त्यासाठी सरकारला कुणाचा ‘ओके’ शेरा घ्यायची गरज नाही. घटना दुरुस्त करून आरक्षण देता येत असल्याने घटनादुरुस्ती करून सरकारने आरक्षण दिले पाहिजे.’डॉ. थोरात म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लोकांचा आवाज सरकारने ऐकावा. या सरकारने काहीच केले नाही, असे म्हणता येणार नाही; परंतु आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लावलेला नाही. मराठा समाजातील दुर्बल घटकाला शिक्षण व रोजगाराची हमी मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने युद्ध जिंकले जाईल.’वसंतराव मुळीक म्हणाले, ‘आता आपण आरक्षणाच्या जवळ आलो आहोत. मराठ्यांचा अंगार पेटला आहे. आरक्षणासाठी पहिले बलिदान मराठा महासंघाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी दिले आहे. आतापर्यंत २३ जणांनी बलिदान दिले आहे. ते वाया जाणार नाही.’
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देतो म्हणून मते मागितली. सत्ता मिळाल्यावर मात्र काहीच दिले नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.’
प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘सरकार मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहत आहे; परंतु या आयोगाने मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा अंतरिम अहवाल लवकर द्यावा.’यावेळी दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर यांचीही भाषणे झाली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. या सभेला महिला-तरुणींसह मराठाबांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते.राज्यकर्त्यांना व्यथा माहीत नाहीमराठ्यांच्या व्यथा राज्यकर्त्यांना माहीत नाही हे दुर्देवी आहे, अशी खंत व्यक्त करत त्यांनी या व्यथा लक्षात घ्याव्यात, असे शाहू छत्रपती यांनी आवाहन केले.
योग्य पावले उचलली नाहीतआरक्षणासंदर्भात राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत योग्य पावले उचलली नाहीत. पुढील काळातही ते पावले उचलतील का हे माहिती नाही; त्यामुळे पुढील तयारीसाठी सज्ज राहा, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.
मराठ्यांचा आवाज ऐकाआरक्षणाबाबत मराठा समाजाने संयम ठेवला असून तो किती दिवस राहतो, हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. आम्ही कमजोर व मूर्ख नसून शहाणे आहोत; त्यामुळे आमचा आवाज ऐका, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.
शांतता पाळल्याबद्दल समाजाचे आभारमराठा आरक्षणासाठी पुकारलेला बंद शांततेत पाळल्याबद्दल शाहू छत्रपती यांनी यावेळी मराठा समाजाचे आभार मानले.
पराक्रमी मराठ्यांनो आत्महत्या करू नकाआम्ही इंग्रज, मोगलांशी पराक्रमाने लढलो आहोत. सध्याचे राज्यकर्ते हे स्वकिय असून त्यांच्याशी लढताना मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करून आततायीपणा करू नये, अशी भावनिक साद डॉ. जयसिंगराव पवार यांनी घातली.
छत्रपतींच्या पायाशी या...आता चर्चा होणार नाही, तरीही ती करायची असल्यास मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या पायाशी यावे, येताना ठोस निर्णय घेऊन यावे, अशी टीका इंद्रजित सावंत यांनी केली.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीकामराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सचिन तोडकर यांनी खालच्या पातळीवर टीका केली.जयललितांनी पेरियारना आरक्षण दिले, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काकणं भरली आहेत का?‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव म्हणाले, ‘आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. तमिळनाडूमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी पेरियार समाजाला आरक्षण दिले व पंतप्रधानांना भेटून घटनेतील परिशिष्ट ९ मध्ये त्याचा समावेश केल्याने त्यास सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येत नाही. एक महिला मुख्यमंत्री हे करू शकत असेल, तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी काय हातात काकणं भरली आहेत का? अशी संतप्त विचारणा जाधव यांनी केली. त्यांच्या या विधानावर आंदोलकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.रणरागिणीचे प्रभावी भाषणमराठा आरक्षणप्रश्नी दोनवडेच्या सई पाटील या रणरागिणीने प्रभावी भाषण केले. ५८ मूक मोर्चे काढूनही सरकारला जाग आली नाही; त्यामुळे आता शिवरायांप्रमाणे लढावे लागणार आहे. त्यासाठी ‘मराठ्यांनो उठा व पेटवा आरक्षणाच्या मशाली’ असे आवाहन सईने केले. त्याला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.
मुंबईतील सभागृह फोडूवेळेत आरक्षण न दिल्यास मुंबईतील विधिमंडळ सभागृह फोडल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.११ मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण का दिले नाही?महाराष्टÑात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत ११ मराठा मुख्यमंत्री झाले; परंतु त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे वाटले नाही, असा टोला पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी लगावला.मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मंत्रालयावर चाल‘सकल मराठा’चा इशारा : ठिय्या आंदोलन सुरूच राहणार
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यातील सकल मराठाचे सर्व समन्वयक एकत्र येऊन मंत्रालयावर चाल करतील, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन यापुढेही असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेले सतरा दिवस कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू होते. कोल्हापूर बंद व जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सर्वांचे आभार मानले.इंद्रजित सावंत म्हणाले, दुसºया टप्प्यासाठी आज, शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामध्ये आता ग्रामीण जनतेचा सहभाग राहणार आहे. १५ आॅगस्टनंतर आंदोलनाची तीव्रता वाढविणार असून, मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यत अशाच पद्धतीने शांततेत; पण अक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांना महाराष्टत फिरू देणार नाहीमराठा आरक्षणासाठी राज्यभर सुमारे २३ जणांनी आत्महत्या केल्या; पण त्यांची शासनाने साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे असे असंवेदशील मुख्यमंत्री फडणवीस हे या