शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मराठ्यांना शासन घाबरले, सरकार अन् राज्यपालांच्याविरोधात कोल्हापुरात मराठा समाजाची घोषणाबाजी

By संदीप आडनाईक | Published: December 18, 2023 5:53 PM

कोल्हापूर : राज्यपाल दौरा अचानक रद्द केल्याने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सोमवारी "मराठ्यांना शासन घाबरले" असे घोषवाक्याचे फलक हातात ...

कोल्हापूर : राज्यपाल दौरा अचानक रद्द केल्याने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सोमवारी "मराठ्यांना शासन घाबरले" असे घोषवाक्याचे फलक हातात धरुन राज्य सरकार आणि राज्यपालांच्या विरोधात दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी केली.ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाचे सुरू असलेले धरणे आंदोलन स्थळी सोमवारी मोठ्या संख्येने सरनोबतवाडी येथील ग्रामस्थ, वकील भगिनी आणि मूक-कर्णबक्षिर असोसिएशनच्या सदस्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, वैशाली माळी, योगीता आडसूळ तसेच वकील भगिनी कल्पना माने, हेमा काटकर, अश्विनी भोसले, कल्पना पाटील, स्वाती तानवडे, संपदा माने, अपर्णा कदम, ओंकार पाटील, अनिसा शेख यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.सकाळी मराठा समाजाने दसरा चौकात साखळी धरणे आंदोलन केले. यावेळी राज्यपालांनी अचानक दौरा रद्द केल्यामुळे मराठ्यांना शासन घाबरले अशा आशयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. छगन भुजबळ आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, प्रा. अनिल घाटगे, सुनिता पाटील, शैलजा भोसले यांनी भाषणे केली. भिवंडी-ठाणे येथील ओबीसी निर्धार मेळाव्यात रविवारी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणूकीत कार्यक्रम करावा असे भुजबळ पुन्हा बाेलल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनुचित घडू नये म्हणून राज्यपालांचा दौरा रद्द केला. याचाच अर्थ मराठा समाजाला घाबरुन सरकारने हा निर्णय घेतला असे ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, परंतु इतर जातीचे आरक्षण हिसकावून घेवून, किंवा इतर जातींवर अन्याय करुन, आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातूनच पाहिजे, परंतु इतर जातीचे आरक्षण हिसकावून घेवून, किंवा इतर जातींवर अन्याय करून, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी नाही. मूक-कर्णबक्षिर असोसिएशन, कोल्हापूर चे अध्यक्ष उद्भव पन्हाळकर, सचिव अभय गवळी, गौरव शेलार, विनोद चव्हाण, संजय चव्हाण, किरण सुर्यवंशी, योगेश जाधव, जयश्री गवळी, अमेय गायकवाड, आर्या फळसळकर, अतुल फणसळकर इ. उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण