शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 5:59 PM

हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.

ठळक मुद्देभावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, नियोजनबद्ध रीतीने सारे लढूया मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आवाहन

कोल्हापूर : हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. बुधवारीही दिवसभर या आंदोलनाचे हिंसक पडसाद राज्याच्या अनेक भागांत उमटले. ते पाहून हा आंदोलनाचा मार्ग नाही, माझ्या प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो, या हिंसक मार्गाने जाऊ नका, असे भावनिक आवाहन या नेत्यांनी केले आहे.

त्यासंबंधीची भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ज्ञानेश महाराव, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, अभ्यासक व वक्ते श्रीमंत कोकाटे, कथाकार आणि नाटककार जयंत पवार, अभिनेते सयाजी शिंदे, पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई, नाटककार, दिग्दर्शक संतोष पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे यांनी निवेदनाद्वारे हे आवाहन केले आहे.त्यात म्हटले आहे,‘मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या शक्तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडले; त्यामुळेच आंदोलनाला आजचे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. हिंसक आंदोलनांमुळे वातावरण तापले तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. भावनिक मुद्द्यावरील आंदोलन मोठ्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही.

मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा; परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे; नाही तर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविल्याचे पातक मराठा समाजाच्या माथी येईल.‘मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कर्ता आणि वडीलधारा समाज आहे; त्यामुळे समाजातील इतर घटकांप्रती त्याची जबाबदारीही मोठी आहे. विविध कारणांसह सरकारी धोरणांमुळे शेती उद्ध्वस्त झाली. त्याचा फटका प्रामुख्याने मराठा समाजाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली.

आर्थिक विपन्नावस्थेत ढकलल्या गेलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे असे कुणाला वाटत असेल तर त्यात चुकीचे नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कामासाठी व्हायला हवा. आपण कर्ते आहोत, तर आपली ऊर्जा व्यवस्था बदलण्यासाठी वापरायला हवी. आरक्षण गरजेचे वाटत असले तरी आपल्या दुखण्यांवर तेवढाच एक इलाज आहे, असे मानण्याचे कारण नाही.’

... तर ध्येयापर्यंत कसे पोहोचणार?जलसमाधी, आत्मदहन यांसारखे मार्ग अवलंबून आपल्याला ही लढाई अखेरपर्यंत नेता येणार नाही आणि हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. नेतृत्वहीन आणि दिशाहीन आंदोलन चालवून काहीच पदरात पडणार नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागले तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनतो आणि मग सरकारचे काम सोपे होते, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर