शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

Maratha Kranti Morcha  : कोल्हापूर : मुंडन अन् शंखध्वनी करून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 5:22 PM

मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सरकारकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी उदय लाड, नंदकुमार सुतार, गणेश सुतार यांनी मुंडण करून घेत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार शंखध्वनी करून तीव्र संताप व्यक्त केला. दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

शुक्रवारी चौथ्या दिवशी आमदार, माजी आमदार यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार मालोजीराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक राजू आवळे यांच्यासह महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय करजगार, अभिजित राऊत, मंदार पाटील, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, संजय शेटे, दक्षिण भारत जैन सभेतर्फे सुरेश रोटे, विजयकुमार शेट्टी, सूर्यकांत पाटील, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचे अध्यक्ष अशोक राबाडे, नितीन खाडे, अशोक कदम, दीपक घोडके, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवास साळोखे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.दरम्यान आंदोलनस्थळी मराठा क्रांती मोर्चाचे उदय लाड, गणेश सुतार व नंदकुमार सुतार यांनी मुंडण करून घेऊन सरकारचा निषेध व्यक्त केला. तर उपस्थित मराठा बांधवांनी शंखध्वनी करत सरकारबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘एक मराठा...लाख मराठा...’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला.

..तर आम्हीही राजीनामा देऊ : हसन मुश्रीफमराठा आरक्षणाचा प्रश्न आमदारांच्या राजीनाम्याने सुटणार असेल तर आमचीही तयारी आहे; परंतु मुख्य प्रश्न हा तत्काळ आरक्षण देण्याचा आहे, त्यामुळे ते तातडीने देण्याची गरज आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर