कोल्हापूर: मराठा दाखला काढताना कोणाचीही तक्रार आल्यास, अधिक शुल्कांची मागणी करुन अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ई सेवा केंद्र चालकांना दिला. दाखले काढण्याविषयी मार्गदर्शन करुन समाजात असणारा संभ्रमही दूर केला.बुधवारी शाहू स्मारक भवनमध्ये मराठा महासंघातर्फे मराठा समाजासाठी जातीचे व नॉन क्रिमीलेयर दाखले काढण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात इथापे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, पिराजी संकपाळ, मानसिंग कांबळे, समृध्दी वर्णे, संदीप फारणे यांच्यासह शहरातील सात ई सेवा केंद्राचे चालक प्रतिनिधी उपस्थित होते.मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर दाखले काढण्याविषयीची किचकट प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूने प्रशासनाच्या मदतीने मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले गेले. यात जवळपास तासभर या चालकांनी दाखले काढण्यासाठी आलेल्यांच्या शंकाचे निरसन केले.विशेषता पिराजी संकपाळ यांनी प्रश्नांना उत्तरे देत दाखला काढण्याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. दाखला काढण्यासाठी जादा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी केल्यानंतर स्वत: इथापे यांनी तक्रारी आल्यास माझ्याशी संपर्क साधा, कोणत्याही परिस्थितीत अडवणूक चालणार नाही असे स्पष्ट केले.
मराठा दाखला : अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:30 PM
मराठा दाखला काढताना कोणाचीही तक्रार आल्यास, अधिक शुल्कांची मागणी करुन अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ई सेवा केंद्र चालकांना दिला. दाखले काढण्याविषयी मार्गदर्शन करुन समाजात असणारा संभ्रमही दूर केला.
ठळक मुद्देमराठा दाखला : अडवणूक केल्यास फौजदारी कारवाईप्रांताधिकारी इथापे यांचा ई सेवा केंद्र चालकांना इशारा