कोल्हापूर : आरक्षणाची पन्नास टक्याची अट आहे. हे माहित असतानाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. ते न्यायालयात टिकले नाही. यामुळे मराठा समाजाची खऱ्या अर्थाने फसवणूक भाजपनेच केली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण केला. कोल्हापुरात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला.ते म्हणाले, केंद्र सरकार आरक्षणाची पन्नास टक्याची अट शिथील करू शकते. पण केंद्रातील भाजपला हे करायचे नाही. अट शिथील करण्यासंबंधी आवाज उठवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करीत होते. त्यांना संसदेत बोलू दिले नाही. यामुळे भाजपच मराठा आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे.खोटं बोल पण रेटून बोलया प्रश्नावर सातत्याने ते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करीत आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा पध्दतीचे त्यांचे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला जाास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सारथीला निधी देण्यात येत आहे. वस्तीगृह सुरू केले जात आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज घेतलेल्यांना व्याज परतावा दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 11:56 AM