शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

By भीमगोंड देसाई | Published: September 12, 2023 3:18 PM

ओबीसीतून आरक्षण द्यावे; इंदूलकर, देसाई उपोषण करणार 

कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, सन २०११ मध्ये देशात जातनिहाय केलेल्या जनगणनेचा अहवाल जाहीर करा, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई हे येथील छत्रपती शिवाजी चौकात २ ऑक्टोबर या गांधी जयंती दिवसापासून आमरण उपोषण करतील. बैठकीत अॅड. इंदूलकर यांनी ही घोषणा केली. दरम्यान, टप्याटप्यात यामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी होण्याचा निर्णय मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे येथील विठ्ठल मंदिरात आयोजित बैठकीत घेण्यात आला.अॅ. इंदूलकर म्हणाले, देश राज्यघटनेवर चालतो. यामुळे पन्नास टक्यावरील ईडब्लूएसचे दहा टक्यांचे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती केली. हे आरक्षण केवळ मराठा समाजासाठी नाही. यामुळे याचा फारसा लाभ समाजाला होत नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची कुजबूज सुरू झाल्यानंतर सत्तेतील बडे राजकीय नेते ओबीसींना रस्त्यावर उतरवत आहेत. मराठा समाजाविरोधात बोलण्यास लावत आहे. हे मोडीत काढले जाईल. पुन्हा एकदा सरकारच्या खुर्चीखाली जाळ येण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन करण्याची गरज आहे. म्हणूनच आरक्षणासाठी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून माझ्यासह दोघेजण उपोषण सुरू करू.सुजीत चव्हाण म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी मराठा समाजाची फसवणूकच झाली आहे. आजपर्यंत आरक्षण न दिलेलेच मराठा समाजाबद्दल आता सहानुभूती दाखवत आहेत. मराठा समाज दुसऱ्याचे काढून आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करीत नाही. आमच्या हक्काचे आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. संध्याकाळपर्यंत आरक्षणप्रश्नी चांगली बातमी येईल. समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.रविकिरण इंगवले म्हणाले, सद्य स्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली पाहिजे. सरकार आणि नेत्यांचे डोळ उघडतील असे आंदोलन करण्याची गरज आहे.यावेळी रूपेश पाटील, अनिल घाटगे, किशोर घाटगे, सुनीता पाटील आदींची भाषणे झाली. बैठकीस ठाकरे गट शिवसेनेचे संजय पवार, सुशील भांदिगरे, बाबा पार्टे, धनंजय सावंत, अमरसिंह निंबाळकर, उदय भोसले, सुनील मोदी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण