कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सरकार नेमके काय करत आहे, याची माहिती संघटनांना दिली जात नाही. संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्यामुळेच या प्रश्नावर विचार करून पुढील दिशा ठरविण्यासाठी १९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील मराठा संघटनांची गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुरेश पाटील म्हणाले, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद होईल. आम्हाला यात राजकारण आणायचे नाही. सरकार काम करत आहे. फक्त त्यासाठी संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पुण्यातील परिषदेमध्ये राज्यभरातून ६० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.महाडिक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी बळी पडलेल्यांच्या घरातील एकाला एस. टी. मध्ये सेवेत घेण्याची घोषणा तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यातील काहीही झालेले नाही. शासनाकडून १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यातील काही जणांनाच ५ लाख रुपये मिळालेत.
मराठा मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा देखावा केला. आता ती सर्व बंद आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती, ते मिळाले नाहीत. ज्या कामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी कॅगनेही ताशेरे ओढले ते शिवस्मारकाचे काम थांबले आहे. या सर्व मागण्या या परिषदेत मांडण्यात येतील.
सारथीसाठी ५०० कोटींची तरतूद करा, मराठा आरक्षणातील गुन्हे मागे घ्या, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटी रुपयांची तरतूद करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी भारत पाटील, भास्करराव जाधव, दिग्विजय मोहिते, चंद्रकांत पाटील, जयदीप शेळके, शिवाजीराव लोंढे, रमेश पाटील, सचिन साठे उपस्थित होते....तर शिवप्रेमी निधी देतीलजर सरकारला शिवस्मारक उभारण्यासाठी निधीची अडचण असेल तर सर्वसामान्य शिवप्रेमीदेखील या कामामध्ये कुठेही मागे हटणार नाही. जगभरातून यासाठी पैसे उपलब्ध होतील. फक्त सरकारने यासाठी जाहीर परवानगी द्यावी. शिवप्रेमीच हा निधी उभारतील.मेटेंना हवी आमदारकीमराठा आरक्षणप्रश्नी नेमलेल्या मंत्री समितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. याबाबत विचारले असता महाडिक म्हणाले, त्यांनी या प्रश्नाच्या जीवावर आमदारकी मिळविली. ती मुदत आता संपत आली आहे. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठी असे बोलावे लागते.