शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Maratha Reservation : मराठा सरकार घराणीही उतरली आंदोलनात; आरक्षणासाठी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:37 PM

मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारला कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध घराण्यांच्या वंशंजातील कुटुंबांनी दिला. मराठा आरक्षणासाठी प्रथमच सरकार घराण्यांतील सदस्यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

ठळक मुद्देमराठा सरकार घराणीही उतरली आंदोलनात; आरक्षणासाठी रस्त्यावरगायकवाड, पाटणकर, निंबाळकर, महागावकर, जाधव, खर्डेकर, माने, घाटगे, मोहिते, घोरपडे सरकारांचा समावेश

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारला कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध घराण्यांच्या वंशंजातील कुटुंबांनी दिला. मराठा आरक्षणासाठी प्रथमच सरकार घराण्यांतील सदस्यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.मराठा ठोक मोर्चाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी आंदोलनाच्या नवव्या दिवशी सकाळी नऊ वाजता इतिहास प्रसिद्ध घराण्यांच्या वंशजातील मराठ्यांतर्फे ‘ताराराणी चौक ते दसरा चौक’अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत गायकवाड, पाटणकर, खानविलकर, निंबाळकर, महागावकर, जाधव, माने, घाटगे, मोहिते, घोरपडे, चव्हाण, शिंदे, आदी घराण्यांतील ३०० हून अधिक सदस्यांचा समावेश होता. यामध्ये महिलाही अग्रभागी होत्या.

रविराज निंबाळकर म्हणाले, मराठा समाजामध्ये अनेक घटक आर्थिक मागास आहेत. मराठा समाजातील शेतकरी कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत मराठ्यांनी अनेक आक्रमणे परतवून लावत स्वराज्यरक्षणास हातभार लावला. मात्र, आता या मराठा समाजालाच न्याय्य हक्कांसाठी लढावे लागत आहे.

मराठा समाज सहसा कधीही रस्त्यावर उतरत नाही. आत मात्र आरक्षणासाठी मराठा समाजाला रस्त्यावरची लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. लोकशाहीला मानणारा समाज आहे. लोकशाही मार्गानेच सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व सरकार घराण्यांतील कुटुंबे सहभागी झाले आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी सरकार घराण्यांतर्फे दिला.

निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहन माने म्हणाले, पुष्पहारातील विविधरंगी फुलांप्रमाणे दोऱ्यामध्ये सर्व जातींची गुंफण करण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्याला समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा दिला पाहिजे.सुप्रिया निंबाळकर म्हणाल्या, आरक्षण आपल्या हक्काचे आहे. आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार असून ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपण सर्वांनी लढू.

जाधव घराण्यातील मनीषा जाधव म्हणाल्या, मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने त्याची प्रगती खुंटली आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन ते त्वरित द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.

यासह उदयसिंह घोरपडे, मधुमती शिंदे, वैष्णवीराजे दाभाडे आणि अश्विनी माने यांनीही मराठा समाजाला तत्काळ आरक्षण जाहीर करावे, अन्यथा या आंदोलनाची व्यापकता वाढवू, असा इशारा दिला.यावेळी करणसिंह गायकवाड, विश्वविजय खानविलकर, समरजितसिंह निंबाळकर, पृथ्वीराज घोरपडे (माद्याळकर), पृथ्वीराज चव्हाण, आदिराज डाफळे, तेजोमय खर्डेकर, विजयसिंह शिंदे (चावरेकर), धनराज शिंदे, संग्रामसिंह शिंदे (नेसरीकर), अ‍ॅड. यशवंत खानविलकर, प्रणिल इंगळे, शत्रुंजय इंगळे, इंद्रजित इंगळे, राजवर्धन शिंदे (सांबरेकर), प्रतापसिंह शिंदे (चावरेकर), धनराज घाटगे, वीरेंद्रसिंह माने (दोघेही वंदूरकर), विनायक घोरपडे (माद्याळकर), अमरसिंह बागल, अ‍ॅड. यश इंगळे, नकुल पाटणकर, संजय घाटगे (वंदूरकर), सिद्धार्थ माने (भादोलेकर), मनीषादेवी घोरपडे-जाधव, तेजस्विनीदेवी घोरपडे (खडेकवाडकर), संग्रामसिंह निंबाळकर (थट्टीकर सरकार), सायेंद्रसिंह मोहिते (रिसालदार), यशसिंह घाटगे (कागल ज्युनिअर), संग्रामसिंह चव्हाण (हिंमतबहाद्दर), आदी उपस्थित होते.घराण्याच्या तलवारीसह रॅलीत सहभागसत्येंद्रसिंह मोहिते हे आपल्या घराण्याची परंपरागत तलवार घेऊन या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते; तर पैलवान कुणालाही उगीच शड्डू मारत नाही. त्यामुळे आमच्यावर सरकारने शड्डू मारण्याची वेळ आणू नये, असा इशाराही रविराज निंबाळकर यांनी दिला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर