कोल्हापूर : मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काहीच दिवसांत शासनाने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रथम आरक्षण आणि त्यानंतर भरती करावी; अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.राजकीय पक्षांनी आरक्षणाचे राजकारण न करता मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पोलीस भरतीत समाजातील तरुणांना आरक्षित स्थान मिळाले नाही तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्य शासनाने पोलीस भरती करू नये.यावेळी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष चेतन पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवाजी खोत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, छावा संघटनेचे राजू सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील, कार्याध्यक्षा अनिता जाधव, जिल्हा सचिव सुवर्णा मिठारी, शहराध्यक्षा सुधा सरनाईक, लता जाधव, आदी उपस्थित होत्या.
Maratha reservation- मराठा आरक्षणाशिवाय मेगाभरती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 6:23 PM
मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काहीच दिवसांत शासनाने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रथम आरक्षण आणि त्यानंतर भरती करावी; अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
ठळक मुद्देमराठा आरक्षणाशिवाय मेगाभरती करू नये संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा, छावा संघटनेची मागणी