शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

मराठा आरक्षणप्रश्नी वडणगे, पाडळी, शिनोळी, उत्तूरला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:42 AM

< p >कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता आठवडा झाला तरी कायम आहे. रविवारीही अनेक गावांत रॅली, बंद, रास्ता रोको या माध्यमांतून आरक्षणाची मागणी करीत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.वडणगे : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी करवीर तालुक्यातील वडणगे, पाडळी बुद्रुक येथील ...

<p>कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता आठवडा झाला तरी कायम आहे. रविवारीही अनेक गावांत रॅली, बंद, रास्ता रोको या माध्यमांतून आरक्षणाची मागणी करीत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.वडणगे : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी करवीर तालुक्यातील वडणगे, पाडळी बुद्रुक येथील व्यवहार बंद ठेवण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलकांनी सकाळी गावातून मोटारसायकलवरून रॅली काढून कोल्हापुरातील दसरा चौकापर्यंत मोर्चा काढला. पाच दिवसांपासून गावात आरक्षणाच्या मुद्द्यावर जनजागृती सुरू आहे. आंदोलकांची ही फेरी पोवार पाणंदमार्गे वडणगे फाट्यावर आली. तेथे रॅलीचे रूपांतर मोर्चात झाले. आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावर रास्ता रोको केला. त्यानतंर हा मोर्चा दसरा चौकात दाखल झाला. यावेळी वडणगेचे सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सूरज पाटील, डॉ. सुनील बी. पाटील, शिवसेनेच्या शुभांगी पोवार, ग्रामपंचायत सदस्या पूनम चौगले, संजीवनी दीपक व्हरगे, राजू पोवार यांची भाषणे झाली. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, तानाजी पाटील, ‘राजाराम’चे संचालक प्रशांत तेलवेकर, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, दीपक व्हरगे, उमेश पाटील, संजय पाटील, शिवसेना शाखाध्यक्ष रमेश पोवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.पाडळी बुद्रुकची रॅली प्रयाग चिखली, आंबेवाडीमार्गे दसरा चौकात आली. या रॅलीत सरपंच अनिता पाटील, उपसरपंच दीपक पाटील, शिवाजी गायकवाड, अशोक पाटील, भिकाजी पाटील आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.शिनोळीतील आंदोलनात सीमावासीयांचा सहभागबेळगाव/चंदगड : चंदगड तालुक्यातील व बेळगाव सीमाभागातील सकल मराठा समाजातर्फे शिनोळी फाटा (ता. चंदगड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर झालेल्या या आंदोलनामुळे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वाजल्यापासूनच आंदोलकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली.शिनोळीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास प्रारंभ झाला. भाजप सरकारचा निषेध व ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा.. लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी प्रकाश शिरोडकर, प्रभाकर खांडेकर, संग्रामसिंह कुपेकर, माजी आमदार मनोहर किणेकर यांची भाषणे झाली. प्रभाकर मरगाळे, गुणवंत पाटील, प्रशांत पाटील, प्रताप सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनात बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, अरविंद पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, बाळासाहेब पाटील, भैरु खांडेकर, संज्योती मळवीकर, शांता जाधव, जय मोरे, विष्णू गावडे, प्रा. दीपक पाटील यांच्यासह समाजाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सीमाप्रश्न सुटला पाहिजे, या आशयाचे फलकही मोठ्या प्रमाणात घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. गडहिंग्लज उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कदम, चंदगडचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता.नायब तहसीलदारांना निवेदनबेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर. टी. झाजरी यांना देण्यात आले.उत्तूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसादआजरा : उत्तूर येथील मराठा समाज, सर्वपक्षीय कार्यकर्ते, तरुण मंडळे, व्यापारी असोसिएशन यांनी पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ वैद्यकीय सेवा सुरू होत्या. ग्रामपंचायतीजवळील छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात केली. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मोर्चा गावातून आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एक तास रास्ता रोको करण्यात आला. बंद शांततेत पार पडला. यावेळी सरपंच वैशाली आपटे, जि. प. सदस्य उमेश आपटे, वसंतराव धुरे, विश्वनाथ करंबळी, उपसभापती शिरीष देसाई, देशभूषण देशमाने, एम. डी. देसाई, मारुती मोरे, रमेश ढोणुक्षे, सदानंद व्हनबट्टे, संजय धुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. अनिकेत आमणगी यांनी स्वागत केले. प्रदीप लोकरे यांनी आभार मानले.उजळाईवाडीत बंदउचगाव : उजळाईवाडी ( ता. करवीर) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा ठोक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी गाव बंद ठेवून ग्रामपंचायतीजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याबरोबर गावातून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर ताराराणी चौकातून दसरा चौक येथे जाऊन मराठा समाजाने केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. या मोर्चामध्ये डी. जी. माने, माजी सरपंच एकनाथ माने, संपत दळवी, सुनिल उर्फ राजू माने, मराठा महासंघाच्या महिला अध्यक्ष शैलजा भोसले, माजी पंचायत समिती सदस्य अरुणिमा माने, वैशाली लांडगे, ग्रा. पं. सदस्य अजय पाटील, राजू गवाळकर, चंद्रकांत पंडित, बाबासाहेब माने, महेश मछले, शशिकांत पाटील, योगेश माने, कार्यकर्ते उपस्थित होते.घानवडे परिसरात बंदम्हालसवडे : घानवडे (ता. करवीर) परिसरात मराठा ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी गाव बंद आंदोलन करण्यात आले. घानवडे, मांजरवाडी व चव्हाणवाडी ग्रामस्थांनी शेतीसह सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. तीनही गावांतील सकल मराठा समाजातील आंदोलनकर्ते एकत्र आले होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत गावातून रॅली काढून मुख्य चौकात तासाभराकरिता रास्ता रोको केले. यावेळी पांडुरंग चव्हाण, साताप्पा चौगले, मुकेश जाधव, सज्जन पाटील, अनिल पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर दामुगडे, सागर सावंत, संदीप पाटील, सागर पाटील, विजय पाटील उपस्थित होते.पोर्ले तर्फ ठाणे येथे पाठिंबापोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील सकल मराठा समाजबांधवांनी मोटारसायकल रॅली काढून कोल्हापुरातील मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सकाळी दहा वाजता पोर्लेतील सकल मराठा समाजाने आरक्षणाची घोषणाबाजी करत रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी मोर्चात सरपंच गणा जाधव, जि. प.चे माजी सदस्य प्रकाश पाटील, गणपती चेचर, राहुल पाटील, सर्जेराव सासने, भाऊ चौगुले, सरदार पाटील, सागर पाचगावकर, राजू रायकर, सागर कदम, आदींसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.‘चंदगड’मध्ये उद्या रॅलीकोवाड : चंदगड तालुका सकल मराठा समाजातर्फे मंगळवार (दि. ३१) रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता कोवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होईल. कोवाड-किणी-नागरदळे-कडलगे-ढोलगरवाडी-मांडेदुर्ग-कार्वे, हलकर्णी फाटा-दाटे-नागनवाडी ते चंदगड असा रॅलीचा मार्ग आहे.गारगोटीत आजपासून ठिय्या आंदोलनगारगोटी : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गारगोटी येथे सोमवारपासून भुदरगड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या ठिय्या आंदोलनात गारगोटी शहरातील सर्व राजकीय पक्षांनी, संघटना व तरुण मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले. यावेळी बाजीराव चव्हाण, संदीप वरंडेकर, माजी उपसरपंच अरुण शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, संग्रामसिंह सावंत, दिलीप देसाई, दीपक देसाई, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मलकापूर, शाहूवाडी बंदमलकापूर : मलकापूरसह शाहूवाडी पंचक्रोशीत सर्वपक्षीयांच्या वतीने कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली. याला विविध संघटनांसह व्यापारी बंधंूनी बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा दिला. मलकापूर शहरासह शाहूवाडी, येळाणे, पिशवी, आदींसह पंचक्रोशीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.सकाळी दहा वाजता मलकापूर येथील सुभाष चौकातून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन रॅली काढण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको केला. सुभाष चौकात झालेल्या सभेत भाई भारत पाटील, प्रकाश पाटील, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, येळाणे ग्रामपंचायत सदस्य रोहित जांभळे, बाबासाहेब पाटील, आनंदा पारळे, पेरीडचे सरपंच संजय पाटील, कोपार्डेचे उपसरपंच दत्ता वारकरी, दत्तात्रय पोवार, नगरसेवक सुहास पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. बंदला राष्ट्रीय दलित महासंघ, मुस्लिम जमियत यांनी देखील पाठिंबा दिला.वळिवडेत ठिय्या आंदोलनगांधीनगर : सकल मराठा समाजाच्या मागण्यांसाठी वेळप्रसंगी पुणे-बंगलोर महामार्ग बंद पाडू; परंतु आता मागे हटणार नाही, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला. वळिवडे (ता. करवीर) येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. यावेळी विविध वक्त्यांनी मराठा समाजाच्या मागण्य पुर्ण करण्याची मागणी केली. या आंदोलनाला