शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

मराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:38 AM

कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मोर्चाच्या जनजागृतीसाठी दि. ३१ जुलै रोजी सकाळी ...

कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मोर्चाच्या जनजागृतीसाठी दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ताराराणी चौकातून दुचाकी रॅली काढून अंबाबाई मंदिरात देवीचा गोंधळ घालून दंडवत घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.भोसले म्हणाले, मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने राज्यभर ५८ मूकमोर्चे निघाले; पण शासनाने ठोस निर्णय घेतले नाहीत; मराठा क्रांती संघटनेमध्ये राज्यातील विविध भागांत काम करणाऱ्या २८ मराठा संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्यावतीने राज्यात ठोक मोर्चे काढण्यात येत आहेत. संयमाने काही मिळणार नसल्याची मानसिकता मराठा समाजाची झाली आहे. त्याकरिता ९ आॅगस्ट रोजी ‘कोल्हापूर जिल्हा बंंद’ची हाक देण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे.आजपर्यंत नेत्यांनी मराठा समाजाचा फक्तमतासाठी उपयोग केला आहे; पण आता मराठा संघटना एकत्र आल्या असून मते कोणाला द्यायची याचाही संघटनाच निर्णय घेणार आहेत. दि. ९ आॅगस्ट रोजीच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्या, मंगळवारी (दि. २४) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन युवकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. याशिवाय या मोर्चात रिक्षा व्यावसायिक, चारचाकी वाहने, लॉरी, शिक्षण संस्था बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेस, जिल्हा युवा प्रमुख मोहनराव मालवणकर, इचलकरंजी विधानसभा प्रमुख नितीन लायकर, सुनीता पाटील, निरंजन पाटील, संजय कुडळे, सुभाष पाटील, अमोल कल्याणकर, गोरख शिंदे, राजू सावंत,मेजर सतीश पाटील, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.सहभागी न होणाºया नेत्यांना श्रद्धांजलीक्रांतिदिनी होणाºया मोर्चामध्ये सत्तेतील लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. जे लोकप्रतिनिधी मोर्चात अगर बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना भर चौकात श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.फक्त११ जणांना कर्जेआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजातील व्यक्तींना कर्ज मिळण्यासाठी निर्माण केल्याचे भासवले जात आहे; पण राज्यातून सुमारे दहा हजार कर्ज मागणीचे अर्ज आले असताना त्यांपैकी ११५ जणांना कर्जे देण्यात आली असून त्यामध्ये मराठा समाजातील ११ जणांचाच समावेश आहे.