शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Maratha Reservation : तीन हजार पोलिसांची नजर, कोल्हापूर शहरातील नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:47 PM

मराठा आरक्षणासाठी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर शहरासह उपनगरातील मराठा कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र येणार आहेत. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याची खबरदारी म्हणून पहाटेपासून तीन हजार पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी बंदची हाक, तीन हजार पोलिसांची नजरकोल्हापूर शहरातील नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमिवर शहरासह उपनगरातील मराठा कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र येणार आहेत. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याची खबरदारी म्हणून पहाटेपासून तीन हजार पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.जिल्'ात कायदा व सुव्यवस्था शांततेत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी बुधवारी बंदोबस्ताची आखणी केली. गुरुवारच्या बंद काळात मोर्चामध्ये काही अनिष्ट व्यक्ती प्रवेश करून घातपात घडवून आणू शकतात, याची खबरदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत.शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहनांची बॉम्बशोध पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश दिले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नाक्यांसह चौका-चौकांत कडक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिल्याने बुधवारी दिवसभर वाहनांची तपासणी सुरु होती.

जिल्ह्यातील संवेदनशिल इचलकरंजी, कागल, शाहूवाडी, आजरा, गगनबावडा, शिरोळ तालुक्यात तेथील उपअधीक्षकांना, निरीक्षकांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या वडणगे, निगवे, आंबेवाडी, केर्ली, केर्ले, गांधीनगर, उचगांव, मुडशिंगी, कळंबा, दिंडर्नेर्ली, वाशी, गोकुळ शिरगांव, पुलाची शिरोली, शिये येथील ग्रामस्थ कोल्हापूर शहरात येण्याची शक्यता गृहीत धरून पोलीसांनी शहरातील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंद काळात सरकारी व खासगी मालमत्तेचे, वाहनांचे नुकसान होऊ नये, याची दक्षता घेतली आहे.आंदोलनात पोलीसहीआंदोलनामध्ये लहान मुले, युवक, युवत्या, महिला, वृध्द सहभागी होणार आहेत. अशा वेळी कोणी कार्यकर्ते हुल्लडबाज करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करु शकतात. अशांवर विशेष नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीसांचे पथक तैनात केले आहे. काही साध्या वेशातील महिला पोलीसही आंदोलनात सहभागी असणार आहेत.तिसरा डोळाही आंदोलनातशहरात १५० पेक्षाजास्त सीसीटीव्ही कॅमेरे विविध चौकात बसवले आहेत. पोलीस मुखालयातील कंट्रोलरुमध्ये एक विशेष पथक शहरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार आहे. काही गैरकृत्य दिसून आलेस वायरलेसवरुन पोलीसांनी संपर्क साधून तेथील परिस्थिती हाताळली जाणार आहे.असा आहे पोलीस बंदोबस्त

  1. पोलीस अधीक्षक - १
  2.  अप्पर पोलीस अधीक्षक - २
  3.  पोलीस उपअधक्षीक्षक - ७
  4. पोलीस निरीक्षक - ३०
  5. पोलीस उपनिरीक्षक, एपीआय - १२०
  6. पोलीस कर्मचारी,एलपीसी - १६००
  7.  होमगार्ड जवान - ६००
  8.  एसआरपीएफ - २ तुकड्या
  9. राज्य राखीव दलाच्या - ३ तुकड्या
  10. बॉंम्बशोधक पथक - १

 

शांतता राखून सहकार्य करा..सामाजिक एकता राखण्याची परंपरा जोपासणारा राजर्षी शाहू महाराजांचा हा जल्हिा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी संस्थान काळात पहल्यिांचा आरक्षण सुरू केले. केंद्र व राज्य सरकारही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे. उच्च न्यायालयाने भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे गुरूवारी होणारे बंद आंदोलन प्रत्येकाने शांततेत पार पडावे. ग्रामीण भागातील लोकांच्या त्यांच्या गावात आंदोलन करावे, शहरात येऊन गर्दी करू नये, तसेच अफावांवर वश्विास ठेवू नको, शांतता राखून पोलीसांना सहकार्य करावे.- अभिनव देशमुखपोलीस अधीक्षक,कोल्हापूर.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस