कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात, त्यात मैलाचा दगड ठरलेले चित्रपट, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना, इतिहास, नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट, प्रमोशन अशी सगळी माहिती आता एका ‘क्लिक्’वर उपलब्ध झाली आहे. ही सगळी माहिती असणारी वेबसाइट चित्रपट महामंडळाच्यावतीने सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, केवळ प्रमोशनमध्ये कमी पडल्याने दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ६६६.ूँ्र३१ंस्रं३ेंँेंंल्लंि’.ूङ्मे ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. अष्टविनायक मीडिया अँड एंटरटेंनमेंट यांनी तयार केलेल्या या वेबसाइटचे मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चित्रपट महामंडळ या नावाने ‘अँड्रॉईड अॅप’ तयार करण्यात आले आहे. यात मराठी चित्रपटांची सविस्तर माहिती मिळणार आहे. अष्टविनायक मीडियाचे संग्राम पाटील यांनी वेबसाईटची माहिती दिली. सुभाष भुरके यांनी स्वागत केले. यावेळी मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारगीर, सतीश रणदिवे उपस्थित होते.
मराठी चित्रपटसृष्टीची वेबसाइट ‘अॅप’
By admin | Published: August 12, 2015 12:30 AM