काेल्हापूर : मराठी भाषा जगातील समृद्ध भाषा असून, तिचे संवर्धन मराठी भाषिकांनीच केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. जी. पी. माळी यांनी केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित ‘कोजिम प्रेरणा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. आय. सी. शेख होते.
डॉ. माळी म्हणाले, टीव्ही, मोबाइल, क्रिकेट यांच्या अतिरेकी प्रेमामुळे अलीकडे लेखन, वाचन आणि चिंतन या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. मराठीवर इतर भाषेचे आक्रमण पाहता मराठी
भाषा बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे. डॉ. आय. सी. शेख म्हणाले, कष्टामुळेच आपणास यश प्राप्त होत असल्याने कष्ट व प्रयत्नच आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोेहचवतील. बी. एस. कांबळे यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केेले. विजय सरगर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
वैशाली आडमुठे, बबन केंगाळे, सुलोचना कोळी, डी. एस. गुरव, नेताजी डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. डी.
पाटील यांनी आभार मानले. शिक्षक नेते दादासाहेब लाड, संजय साबळे, उदय पाटील, आशा नलवडे, अरुण कुंभार, राहुल टिपुगडे, सूरज पाटील, अन्वर पटेल, जी. आर. पाटील, व्ही. जी. सुतार, नवीनचंद्र सणगर, एम. एस. पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी अध्यापक संघाच्या वतीने ‘कोजिम प्रेरणा’ पुरस्काराने शिक्षकांना गौरवण्यात आले. (फोटो-२३०२२०२१-कोल- मराठी)