बेळगाव : राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली असून आयोजकांवर दबाव टाकण्यात येत आहे. सीमाभागात मराठी कार्यक्रम होऊ देऊ नका, असा आदेश गृहमंत्रालयाकडून आल्यामुळे साहित्य संमेलन नाही होऊ देणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र, सायंकाळी संमेलनाला परवानगी दिली आहे. कुद्रेमानी येथे गेल्या 14 वर्षांपासून मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्यात येते. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यावर विचार मंथन होते. पण आता साहित्य संमेलने कर्नाटकी पोलिसांना खुपत असून त्यांनी या वर्षी कोणत्याही प्रकारे साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी धमकी आयोजकांना दिली होती. कुद्रेमानी आणि इदलहोंड येथे दोन साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. इदलहोंड येथें 17 वे गुंफण साहित्य संमेलन तर कुद्रेमानी मराठी साहित्य संमेलन आहे. इदलहोंड येथे गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस तर कुद्रेमानी येथील संमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील साहित्यिक अशोक बागवे अध्यक्ष असणार आहेत.दोन्ही साहित्य संमेलनातून मराठीचा जागर केला जातोय यंदा मात्र पोलिसांनी परवानगीचे निमित्त पुढे करत साहित्य संमेलनावर गदा आणण्याचा प्रयत्न चालू केला होता.दोन्ही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना पोलिसांनी संमेलन भरवू नका, असे सांगत दबाव वाढवण्यासाठी सुरूवात केली होती.कुद्रेमानी आणि खानापूर मधील इदलहोंड मध्ये उद्या रविवारी संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनामुळे कन्नड-मराठी असा वाद वाढत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे मराठी साहित्य संमेलने होऊ देऊ नका, असा आदेश गृह खात्याने दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहल्ली यांनी साहित्य संमेलनांच्या आयोजकांबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी माहिती डीसीपी सीमा लाटकर यांनी दिली. मराठी संस्कृती चिरडण्याच्या कर्नाटकी कृत्याचा सीमाभागात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
कर्नाटक सरकारने अखेर मराठी साहित्य संमेलनाला परवानगी दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:59 PM
राजकीय दृष्ट्या सीमावासी मराठी भाषिकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकी सरकारने आता संस्कृती क्षेत्रातही दडपशाही अवलंबली आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली असून आयोजकांवर दबाव टाकण्यात येत आहे.
ठळक मुद्देमराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाहीसीमा भागातील पोलिसांची वक्रदृष्टी