कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ५०० व १००० च्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे सलग सहाव्या दिवशी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. यामध्ये भाजीपाल्यांसह कांदा-बटाटा मार्केटही थंडावला आहे. तर धान्य बाजारात तूरडाळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हळूहळू मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेल्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे. तर शेतकरीही ५00, १000 च्या नोटा स्वीकारत नसल्याने व्यापारी उधारीवर मालाची खरेदी व विक्री करीत आहेत. ज्याच्याकडे १00, २0 व ५0 रुपयांच्या पटीत नोटा आहेत. त्या व्यापाऱ्यांकडेच मालाचा उठाव होत आहे. तर अन्य व्यापाऱ्यांना कमी भावात व उधारीवर भाजीपाला विक्री करणे भाग पडत आहे. याशिवाय दिवसभरात मालाचा उठाव न झाल्याने काही माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे या घाऊक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये भाज्यांचे भाव दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे : (कंसात कालचे दर) दोडका ११० रु. (१५०-२००), वांगी - १०० रु. (१६०-१७०), रताळी ६० रु. (१००), ढब्बू मिरची - १०० रु. (१८०), आले - १२० रु. (१८०), कोबी - २ रुपये प्रतिनग, कारली -११० रु. (१५०) असे दर घसरले आहेत. याचा परिणाम म्हणून बाजार ७० टक्के थंडावला आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे, मुंबईकडे जाणाराही माल याच ठिकाणी आल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली. माथाडी कामगारांना अपेक्षित मेहनताना मिळेना झाल्याने तेही हवालदिल झाले आहेत.आवक नाही : मार्केट ठप्पनोोटा रद्दचा कांदा-बटाटा मार्केटवरही परिणाम झाला आहे. आग्रा, इंदोर येथून येणाऱ्या बटाट्याची नवी आवक कमी झाली आहे. तर मंंगळवेढा, हंगेवाडी, पंढरपूर येथून नव्या कांद्याचीही आवक कमी झाली आहे. यापूर्वीच्या मालाला दरही चांगला होता. तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून उठावही होत होता. नोटा रद्दमुळे आग्रा, इंदोरहून येणारा नवा माल येईनासा झाला आहे. यात ट्रकधारकांना डिझेलपुरते तरी पैसे मिळतील की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे बाहेरून माल येईना झाला आहे. शिल्लक मालही तसाच पडून असल्याने मार्केट थंडावले आहे. किलोला १० ते २० रुपये इतका दर उतरला आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. तत्काळ सुट्ट्या पैशांची सोय करावी. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करताना व्यापारी काकुळतीला आला आहे. शेतकरी चेकने पेमेंट घेत नसल्याने पंचाईत होत आहे. मालाची आवक मोठी आहे; पण उठाव नसल्याने पैसे कसे भागवायचे, प्रश्न आहे.- बाबूराव लाड (कांदेकर), ंभाजीपाला घाऊक व्यापारी, मार्केट यार्डबाहेरून येणाऱ्या मालाच्या डिलिव्हरीसाठी व ट्रक चालकांना रोख स्वरूपात सुट्टे पैसे देण्यासाठी नसल्याने काही मालाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत तूरडाळीची लातूरहून कमी आवक झाली आहे. त्यामुळे तुरडाळीचा तुटवडा जाणवत आहे. तत्काळ सरकारने सुट्ट्या पैशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यातून व्यवहार सुरळीत होतील. - सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघ.
मार्केटही थंडावले
By admin | Published: November 17, 2016 1:10 AM