कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने समितीच्या जिल्हा बँकेत चार कोटीच्या ठेवी ठेवू शकलो. त्याचबरोबर २०१९-२० या सालात ७५ लाखांचा वाढावा (नफा) झाला असून, कागल येथे जनावरांचा आठवडी बाजार ९ एप्रिल पासून सुरू करत असल्याची घोषणा बाजार समितीचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.बाजार समितीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी समिती कार्यालयात ऑनलाइन झाली. कागल येथील जनावरांचा बाजार कधी सुरू करता? अशी विचारणा दत्ता पाटील (केनवडे) यांनी केली. यावर २१ एप्रिल रोजी हा बाजार सुरू करता? असून पेट्रोलपंप जागा मान्यतेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिल्याचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले. सचिव जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. प्रा. जालंदर पाटील यांनी आभार मानले. यावेळी बी. एच. पाटील, सूर्यकांत पाटील, अजित पाटील-परितेकर, कल्याणराव निकम, आर. वाय. पाटील, दिगंबर पाटील, अजित पाटील, दगडू भास्कर, उपसचिव के. बी. पाटील, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.स्थलांतर न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई कराटेंबलाईवाडी धान्य बाजारासाठी लाखो रुपये खर्च केले, तरीही लक्ष्मीपुरी येथील व्यापारी तिथे जात नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना पांडुरंग पाटील (बाचणी) यांनी केली.